महापालिका पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी नारायण घोरपडे यांचा सेवानिवृत्तीबद्दल सत्कार

0
32

नगर – अहमदनगर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी नारायण घोरपडे यांनी आतापर्यंत इमानेइतबारे चांगली सेवा केली. नगरकरांकडूनही त्यांना चांगले प्रेम मिळाले. मनपाच्या विविध विभागांत काम करीत असताना त्यांना अनेक चांगले वाईट अनुभव आहे. त्यांच्याकडे आता मोठी अनुभवाची शिदोरी असून, त्यांनी या शिदोरीचा उपयोग मनपाच्या इतर कर्मचार्‍यांना करून द्यावा. नोकरी करीत असताना अनेक गोष्टी इच्छा असूनही तुम्ही त्याची पूर्ती करू शकत नाही. श्री. घोरपडे यांनी यापुढील काळात त्यांच्या इच्छा पूर्ती करून इतर कर्मचार्‍यांना वेळप्रसंगी मदत करावी, असे राजूभाई शेख म्हणाले. महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी नारायण घोरपडे यांचा वसंत टेकडी येथील मनपा कर्मचारी, सहाय्यक मदतनीस व्हाल्व्हमन यांच्या वतीने राजूभाई शेखयांच्या हस्ते सेवानिवृत्तीबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी श्री. शेख बोलत होते. याप्रसंगी अजय हराळे, संजय नागापुरे, जावेद खान, लखन कर्डिले, बन्सी झिने, बंडू झिने, भरत पवार, नाना कराळे, संजय पवार, सचिन पटेकर, महामुनी फिटर, आसाराम गुंड, कार्तिक लांडे, आर. के. बेंद्रे, सैफ बागवान, प्रथमेश चाकणे, रमेश राईन्स उपस्थित होते.

श्री. घोरपडे सत्कारास उत्तर देताना म्हणाले की, महापालिकेत आपण ४२ वर्षे सेवा केली आहे. मनपाच्या विविध विभागांमध्ये आपण काम केले. या काळात काम कोणतेही असो ते आनंदाने केले. काम करीत असताना आयुक्त डॉ. पंकज जावळे, अभियंता परिमल निकम, तसेच सर्वच अधिकार्‍यांनी चांगले मार्गदर्शन करून सहकार्य केले. नोकरी करीत असताना इच्छा असून देखील अनेक गोष्टी करू शकलो नाही. कुटुंबाला अपेक्षित वेळ देऊ शकलो नाही. आपल्या इच्छाय्आकांक्षांना मुरड घालावी लागली. यापुढील काळात या सर्व गोष्टी करू. अनुभवाच्या शिदोरीचा मनपातील इतर कर्मचार्‍यांना फायदा करू देऊ. दुसर्‍याच्या उपयोगी पडणे हे आपला स्वभावच आहे, असे ते म्हणाले. श्री. घोरपडे यांना सेवानिवृत्तीबद्दल व भावी आयुष्यासाठी आयुक्त, उपायुक्त व अधिकार्‍यांनी शुभेच्छा संदेश दिले.