रेकॉर्डवरील गुन्हेगाराला गावठी कट्‌ट्यासह पकडले

0
14

लेरा ब्रूस मैदानावर कोतवाली पोलीसांची कारवाई

नगर – काहीतरी गुन्हा करण्याचे उद्देशाने कमरेला गावठी कट्टा लावून फिरणार्‍या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला कोतवाली पोलिसांच्या पथकाने पकडले असून त्याच्याकडून १ गावठी कट्टा व २ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. बिरज्या उर्फ बिरजू राजु जाधव (वय २६, रा. मकासरे चाळ, कोठी) असे या आरोपीचे नाव आहे. या गुन्हेगाराकडे गावठी कट्टा असल्याची गोपनीय माहिती कोतवालीचे पो.नि.प्रताप दराडे यांना मिळाली होती. त्यांनी गुन्हे शोध पथकाचे स.पो.नि. योगिता कोकाटे व अंमलदारांना लेरा ब्रूस मैदानावर कारवाई साठी पाठविले. या पथकाने गुरुवारी (दि.४) दुपारी २.२० च्या सुमारास तेथे जावून बिरजू जाधव याला पकडले.

त्याची पोलीसांनी अंगझडती घेतली असता त्याचे कडे १ गावठी कट्टा व मॅगझीन मध्ये २ जिवंत काडतुसे असा एकूण ३१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला. या प्रकरणी पो.कॉ. प्रमोद लहारे यांचे फिर्यादीवरुन आरोपी जाधव विरुद्ध शस्र अधिनियम कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे स.पो. नि. योगीता कोकाटे, पो.हे.कॉ. योगेश भिंगारदिवे, ए.पो. इनामदार, संदिप पितळे, पो.ना. अविनाश वाकचौरे, म.पो.ना. संगिता बडे, पो.कॉ. दिपक रोहोकले, सत्यजित शिंदे, तानाजी पवार, प्रमोद लहारे, अतुल काजळे, सुरज कदम, सचिन लोळगे, अमोल गाडे, सुजय हिवाळे यांनी केली आहे.