उद्योजक शरद दातरंगे यांचा कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

0
16

युवकांच्या हातून समाजाचे चांगले काम उभे राहील : आ.संग्राम जगताप

नगर – शहरातील नागरिकांना बरोबर घेऊन विकासाचे प्रश्न मार्गी लावली जात आहे. यामध्ये युवकांना देखील बरोबर घेतले जाते. यामुळेच सर्वांच्या सहकार्यातून चांगले काम उभे राहत असते.आजच्या युवा पिढीला योग्य मार्गदर्शनाची खरी गरज असून त्यासाठी सर्वांनी आपली परंपरा व संस्कृती जोपासणे गरजेचे आहे. युवकांना योग्य दिशा दिल्यास सुसंस्कृत पिढी निर्माण होईल. त्यातून युवकांच्या हातून समाजाचे चांगले काम उभे राहील. आज युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहे. उद्योजक शरद दातरंगे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह प्रवेश केला असून त्यांनी पक्षाचे ध्येय धोरणे व केलेली विकास कामांचा लेखाजोखा समाजापर्यंत घेऊन जाण्याचे काम करावे असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले. उद्योजक शरद दातरंगे यांच्यासह कार्यकर्त्यांचा आ.संग्राम जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झाला. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, प्रा.अरविंद शिंदे, युवराज शिंदे, करण लांडे, निलेश ससाणे, मिलिंद गुंजाळ, स्वप्नील दातरंगे, बंडू दातरंगे, भूषण गारुडकर, योगेश दातरंगे, प्रथमेश आगरकर, सोनू दातरंगे, दीपक सुडके, अभय दातरंगे, पंकज होले, मंथन आढाव, गौरव पाचबैल, दीपक घोडके, समीर तांबोळी, गणेश बडवे, अशोक दातरंगे, राहुल कवडे, सचिन वाघुले, सोमनाथ वाघुले, सुरेश दरेकर, प्रणव दरेकर, अक्षय दातरंगे, जगदीश धारक आदी उपस्थित होते. शरद दातरंगे म्हणाले की, आ. संग्राम जगताप यांनी नगर शहरांमध्ये सर्व जाती धर्मातील लोकांना बरोबर घेऊन शहर विकासाचे प्रश्न मार्गी लावले आहेत. जनतेच्या सुख दुःखामध्ये सामील होऊन काम करत असल्यामुळे त्यांचा समाजाशी ऋणानुबंध निर्माण झाला आहे. नगर शहरामध्ये कधी नव्हे एवढी विकास कामे त्यांच्या काळामध्ये पार पडत असल्यामुळे शहराच्या वैभव भर पडत आहे. त्यांच्या या कामाचा आदर्श आम्ही सर्व युवकांनी घेतला असल्यामुळे आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहोत असे ते म्हणाले.