नगरमध्ये उड्डाणपुलावर धान्याचा ट्रक पलटी

0
44

नगरच्या उड्डाणपुलावर पुन्हा एकदा अपघात झाला असून बुधवारी (दि.३) सकाळी ७ च्या सुमारास मयाच्या गोण्या घेऊन चाललेला ट्रक पलटी झाला. या अपघातात ट्रक चालक किरकोळ जखमी झाला आहे. हा ट्रक जालन्यावरून शिक्रापूरच्या दिशेने चालला होता. ट्रकमध्ये गोण्या जास्त होत्या. उड्डाणपुलावरील वळणावर ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक पलटला. ट्रकमधील काही गोण्यात उड्डाणपुलावरून विक्रीकर भवनच्या बाजूने खाली रस्त्यावर पडल्या. मागील १५ दिवसांत उड्डाणपुलावर अपघात होण्याची ही तिसरी घटना आहे.