नगर – निवडणूक काळात पक्षाच्या पदाधिकार्यांना व कार्यकर्त्यांना मतदारांपर्यंत सहज व डीजीटल पद्धतीने पोहचण्यासाठी उपयुक्त ठरेल अशा बीजेपी विंग्ज अॅपची निर्मिती करण्यात आली आहे. प्रदेश भारतीय जनता पार्टीच्यावतीने पूर्ण राज्यात बीजेपी विंग्ज अॅपचा वापर प्रभावीपणे करण्यासाठी या अॅपच्या प्रदेश संयोजक पदावर नगरच्या मल्हार गंधे यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी मुंबईत केली. मल्हार गंधे यांनी या आधीही प्रदेश सोशल मिडिया प्रमुख म्हणून काम केले आहे. मल्हार गंधे यांनी सांगितले, सध्याच्या डीजीटल युगात निवडणूक काळात मतदारांपर्यंत डीजीटल मार्गानेच जाण्यासाठी पक्षाने हे अत्यंत अत्याधुनिक व तितकेच सोपे अॅप बनवले आहे. सर्व निवडणुकांमध्ये हे अॅपच्या पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. पक्षाच्या स्थापनादिन ६ एप्रिल रोजी या अॅपचे उद्घाटन नागपूर येथे होणार आहे. निवडणुकीत अत्यंत महत्वाची भूमिका बजावणार्या या अॅपच्या प्रदेश संयोजक पदावर माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यास प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी संधी दिल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. वडील महेंद्र गंधे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षात विविध पदांवर काम केले आहे. आता या नव्या पदाच्या माध्यमातून पूर्ण राज्यात या अॅपची प्रभावी अमलबजावणी करून पक्षचा विजय सुकर करणार आहे.