रमजान ईद निमित्त केडगाव मशिदीस आकर्षक विद्युत रोषणाई

0
10

नगर – केडगाव नगर पुणे रोडवरील सुन्नीशाही जामा मशिदीस रमजाननिमित्त सालाबाद प्रमाणे आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे भारतासह जगभरात मुस्लिम बांधव रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करतात चंद्र दर्शन झाल्यानंतर रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. त्यानिमित्त ठिकठिकाणी मशिदीवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येते. याही वर्षी चंद्र दर्शन झाल्यानंतर ११ एप्रिल किंवा १२ एप्रिल २०२४ रोजी रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर केडगाव येथील सुन्नीशाही जामा मशिदीवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मशिदीचे अध्यक्ष जनाब हाजी अकबर पठाण, हाजी उस्मान मणियार, रफिक भाई शेख, मुन्नवर सय्यद, नदीमरजा शेख, साहिल पठाण, नजीर पिरजादे या बांधवांनी सर्वधर्मियांना रमजान ईदच्या शुभेच्छा देत प्रत्येक समाजात जात धर्म पंथ असला तरी प्रत्येक व्यक्तीमध्ये जातीय सलोखा राष्ट्रीय एकात्मता ही असते, ती जागृत करण्याचे काम आपण केले पाहिजे, असे आवाहन करण्यात आले.