गतिरोधकावर दुचाकी आदळल्याने रस्त्यावर पडून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

0
74

नगर – मुलीच्या लग्नाचे निमंत्रण नातेवाईकांना देण्यासाठी पती समवेत मोटारसायकल वर चाललेल्या महिलेचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नगर तालुयातील वाळकी येथे शनिवारी (दि.३०) दुपारी घडली. सुवर्णा भाऊसाहेब भोर (वय ४०, रा. चास, ता.नगर) असे मयत महिलेचे नाव आहे. मयत भोर यांच्या मुलीचे येत्या ५ एप्रिलला लग्न होते. त्याचे निमंत्रण नातेवाईकांना देण्यासाठी तसेच एका नातेवाईकाच्या घरी वाळकी येथे शनिवारी (दि.३०) दुपारी लग्न असल्याने त्या त्यांचे पती भाऊसाहेब भोर यांच्या समवेत मोटारसायकलवर चास येथून वाळकीला गेल्या होत्या. वाळकी गावाजवळ शाळेच्या समोर गतिरोधकावर त्यांची मोटारसायकल आदळल्याने सुवर्णा या उडून रस्त्यावर पडल्या. त्यात त्यांच्या डोयाला गंभीर दुखापत झाली. त्यांना पती व इतर नातेवाईकांनी तातडीने नगरला एका खाजगी रुग्णालयात नेले मात्र तेथील डॉटरांनी त्यांना उपचारापूर्वीच मयत घोषित केले. याबाबत डॉटरांच्या खबरीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत सुवर्णा यांच्या पश्चात पती, १ मुलगा, १ मुलगी, सासू, दीर, भावजय असा परिवार आहे.