लष्करी जवानाची पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण

0
23

नगर- पोलीस कर्मचार्‍याला मारहाण केल्याच्या आरोपावरून लष्करी जवान दामोदर सानप (रा. सैनिकनगर, भिंगार) याला कॅम्प पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने नंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. यासंदर्भात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे वाहन चालक एस. एन. काळे यांनी फिर्याद दिली आहे. दामोदर सानप लष्करी जवान असून श्रीनगरमध्ये (काश्मीर) नियुक्त आहे. दामोदर सानप दारू पिऊन त्रास देत असल्याची तक्रार घेऊन त्याचे सासरे व मेव्हणा भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात शनिवारी (दि.३०) सायंकाळी आले होते. पोलिसांनी सानप याला पोलीस ठाण्यात बोलावून आणण्यासाठी चालक काळे व पो.हे.कॉ.दिवटे यांना वाहन घेऊन पाठवले. परंतु सानप याने दिवटे यांना शिवीगाळ करून मारहाण केली. याबाबत काळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सानपविरूद्ध सरकारी कामात अडथळा आणण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.