घरात घुसून चोरट्याने दागिने व रोकड पळविली

0
23

नगर – घर उघडे असलेले पाहून अज्ञात चोरट्याने घरात घुसून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ३० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना नगर तालुयातील अरणगाव शिवारात असलेल्या पुंड मळ्यात शुक्रवारी (दि.२९) सायंकाळी ७.३० च्या सुमारास घडली. याबाबत प्रवीण भाऊसाहेब पवार (रा. पुंड मळा, अरणगाव, ता.नगर) यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात शनिवारी (दि.३०) फिर्याद दिली आहे. शुक्रवारी सायंकाळी पवार यांचे कुटुंबीय घराजवळ कामात असताना अज्ञात चोरट्याने उघड्या घरात घुसून दागिने व रोख रक्कम चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध भा.दं.वि.कलम ४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.