१०० कोटींच्या ठेवी हा पतसंस्थेच्या इतिहासातील सुवर्ण क्षण : नरेंद्र फिरोदिया

0
35

सहकारमहर्षी सुवालालजी गुंदेचा जैन ओसवाल पतसंस्थेने १०० कोटींच्या ठेवींचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला

नगर – सहकारी बँकिंग क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तीमत्व सुवालालजी गुंदेचा यांनी दूरदृष्टीने स्थापन केलेल्या जैन ओसवाल पतसंस्थेने २३ वर्षांच्या वाटचालीत १०० कोटींच्या ठेवींचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला आहे. स्थापनेपासूनचे सर्व आजी माजी संचालक, कर्मचारी यांचे योगदान आणि सभासद, ठेवीदारांचा विश्वास यामुळे ही कामगिरी शय झाली आहे. पतसंस्थेने आता नगर जिल्ह्यात शाखा विस्तार करून आपली सर्वोत्तम सेवा इतरत्रही उपलब्ध करून द्यावी तसेच समाजातील शेवटच्या घटकाला आर्थिक पत देवून त्याच्या उन्नतीसाठी प्रयत्न करावेत. २५ वर्षे साजरे करताना पतसंस्था आणखी मोठी भरारी नक्कीच घेईल असा विश्वास जैन ओसवाल पंचायत सभेचे अध्यक्ष तथा उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांनी केले. सहकारमहर्षी सुवालालजी गुंदेचा जैन ओसवाल पतसंस्थेने १०० कोटी रुपये ठेवींची ऐतिहासिक टप्पा ओलांडला आहे. ३० मार्च २०२४ अखेर हा विक्रम करण्यात आला असून पतसंस्थेने पाहिलेले एक मोठे स्वप्न साकारले आहे. यानिमित्त पतसंस्थेच्या मुख्यालयात आजी माजी संचालक, कर्मचार्‍यांचा गौरव करण्यात आला तसेच सभासदांच्या उपस्थितीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. फटायांच्या आतषबाजी करून जल्लोष करण्यात आला.

याप्रसंगी सी.ए.अशोक पितळे, चेअरमन संतोष गांधी, व्हाईस चेअरमन समीर बोरा, माजी संचालक सुभाष मुथा, विजय गांधी(नेवासा), पेमराज पितळे, राजेंद्र गांधी, सी.ए.सुमित फिरोदिया, विजय कोठारी, अजित बोरा, ईश्वर बोरा, किरण शिंगी, सी.ए.संकेत पोखर्णा, लताताई कांबळे, छाया मुथा, कल्पना गांधी यांच्यासह धनेश भंडारी, नरेश मुथा, राकेश गांधी, शेखर गांधी, प्रमोद डागा, माजी कर्मचारी विष्णू रंगा, सचिन घोडके, संतोष बुरा, अंकिता मुथा, महेंद्र लुणिया, सूर्यकांत म्हस्के, संचालक मनोज गुंदेचा, अभय पितळे, शैलेश गांधी, चेतन भंडारी, विनीत बोरा, आनंद फिरोदिया, शरद गोयल, सुवर्णा डागा, प्रिती बोगावत, विनय भांड, तज्ज्ञ संचालक शांतीलाल गुगळे, सी.ए.परेश बोरा, सरव्यवस्थापक प्रशांत भंडारी, नयना बोगावत, मनोज लुणिया, महेंद्र कांबळे आदी उपस्थित होते. सी.ए.अशोक पितळे म्हणाले, सर्वोत्कृष्ट बँकिंग सेवा, पारदर्शी कारभार आणि सर्वोत्तम व्यवस्थापन यासाठी पतसंस्था नावाजली जाते. स्व. सुवालाल गुंदेचा यांनी दूरदृष्टीने पतसंस्थेची मुहुर्तमेढ रोवताना कायम शिस्तबद्ध कारभारावरून भर दिला. विश्वासार्हता आणि प्रामाणिकपणाने रूजवला. त्यांच्या याच आदर्शांवर विद्यमान संचालक मंडळ विश्वस्त भावनेने काम करीत आहे. ठेवी सातत्याने वाढत असल्याने आता संस्थेने कर्ज वसुली प्रभावीपणे होईल यादृष्टीनेही प्रयत्न करावेत. माजी चेअरमन सुभाष मुथा, विजय गांधी, राजेंद्र गांधी यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, आपण लावलेल्या एका छोट्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर होताना पाहून मनस्वी आनंद होतो. शिस्तबध्द कारभार, विश्वासार्हता आणि प्रामाणिकपणा ही परंपरा नव्या पिढीनेही कायम ठेवत संस्थेचा नावलौकिक वृध्दींगत केला आहे. पतसंस्थेची घोडदौड सर्वांसाठीच अभिमानास्पद आहे.

पतसंस्थेच्या इतिहासात आजपर्यंत इतया कमी कालावधीत ठेवींमध्ये ३० टक्के वाढ झाली नव्हती. या कामगिरीसाठी संचालक, कर्मचारी, सभासद, ठेवीदार अभिनंदनास पात्र असल्याचे त्यांनी म्हटलं. स्वागत करताना चेअरमन संतोष गांधी म्हणाले, पतसंस्थेने नेहमीच नाविन्यपूर्ण योजना राबवून ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे. नुकतीच जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना ठेवींवर अतिरिक्त व्याज देणारी योजना राबविण्यात आली. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. याशिवाय सोनं खरेदीसाठी कर्ज ही अभिनव योजनाही ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहे. पतसंस्थेकडून वेअर हाऊस कर्ज, सोने तारण कर्ज आदी कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. याशिवाय विविध शासकीय कर भरणा, आरटीजीएस, डिमांड ड्राफ्ट, संगणकीकृत कामकाज, एसएमएस सेवा, यु आर कोड अशा अत्याधुनिक सुविधाही उपलब्ध आहेत. पतसंस्थेशी व्यवहार करणार्‍या प्रत्येकाला आर्थिक सुबत्ता लाभावी, त्यांची स्वप्ने साकार व्हावी यासाठी पतसंस्थेने कायम चांगला कारभार करण्यावर भर दिला आहे. आताच्या तीव्र स्पर्धेच्या युगात पतसंस्थेने स्वतः ला सिद्ध केले आहे. १०० कोटींच्या ठेवी हा पतसंस्थेचा मोठा गौरव असून भविष्यातही सर्वोत्तम कारभाराची परंपरा कायम राखू अशी ग्वाही त्यांनी दिली. प्रास्ताविक सरव्यवस्थापक प्रशांत भंडारी यांनी केले. व्हा. चेअरमन समीर बोरा यांनी आभार मानले. १०० कोटींच्या ठेवींचा ऐतिहासिक पल्ला गाठताना पतसंस्थेने माजी संचालक, माजी कर्मचार्‍यांना बोलावून आवर्जून त्यांचा गौरव केल्याने सभासदांमधून विद्यमान संचालक मंडळाचे कौतुक होत आहे.