सभासदांच्या अडी अडचणीच्या काळात मदतीचा हात दिला जातो

0
16

नगर – मनपा कर्मचारी पतसंस्थेने सभासदांच्या अडीअडचणीच्या काळात धावून येत मदतीचा हात दिला आहे, वैद्यकीय सेवा दिवसेंदिवस महाग होत चालली असून त्यामुळे सभासद आपल्या आजारपणाकडे दुर्लक्ष करतात. सभासदांच्या आजारपणाचे तात्काळ निदान व्हावे यासाठी मनपा कर्मचारी पतसंस्था तातडीने २५ हजार रु.ची मदत देत असते. याचबरोबर सभासदांच्या मुला मुलींच्या शिक्षणासाठी व सुभकार्यासाठी तातडीने कर्जरूपीची आर्थिक मदत दिली जाते. सभासदांच्या विश्वासाच्या जोरावर पतसंस्था स्वभांडवली जाली असून पतसंस्थेला १०० वर्षांची परंपरा लाभली आहे. या माद्यमातून सभासदांच्या हिताचे निर्णय घेतले जातात, असे प्रतिपादन किशोर कानडे यांनी केले. अहमदनगर मनपा कर्मचारी पतसंस्थेच्या वतीने सभासद गजानन कोतकर यांना वैद्यकीय उपचारासाठी २५ हजार रुपयांचा धनादेश चेअरमन किशोर कानडे यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी व्हा. चेअरमन सोमनाथ सोनवणे, जेष्ठ संचालक बाबासाहेब मुदगल, संचालक जितेंद्र सारसर, संचालक बाळासाहेब गंगेकर, सतीश ताठे, विकास गिते, श्रीधर देशपांडे, बलराज गायकवाड, अजय कांबळे, बाळासाहेब पवार, विजय कोतकर, कैलास चावरे, गुलाब गाडे, संचालिका प्रमिला पवार, उषाताई वैराळ, कार्यलक्षी संचालक आनंद तिवारी आदी उपस्थित होते. यावेळी व्हा.चेअरमन सोमनाथ सोनवणे म्हणाले की पतसंस्थेचे सर्व संचालक मंडळ हे सभासदांच्या हिताचे निर्णय घेत असतात. सभासदाच्या वैद्यकीय उपचारासाठी घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे असे ते म्हणाले.