रंगपंचमीचा महिला व युवतींनी मनसोक्त आनंद लुटला

0
14

नगर – फक्त महिला व युवतीसाठी श्री सिद्धेश्वर तरुण मंडळ, जंगूभाई तालीम व क्रिएटर्स डान्स अ‍ॅकॅडमीच्या वतीने सावेडीतील बंधन लॉनच्या पाठीमागे रंगपंचमी निमित्त रंग बरसे या कार्यक्रमाचे विनामूल्य आयोजन करण्यात आले होते. त्याचे संयोजन अभिमन्यू राजूमामा जाधव व दिनेश फिरके यांनी केले यावेळी रेन डान्स, फोम होली, डान्स फ्लोअर आधी होते. कार्यक्रमास महिला व युवतींचा प्रतिसाद मिळाला यावेळी बोलताना अभिमन्यु जाधव म्हणाले रंगपंचमी सणाचे पवित्र राहावे परंपरेने प्रमाणे ही रंगपंचमी साजरी व्हावी यासाठी सलग पाचव्या वर्षी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रम यशश्वी होण्यासाठी कार्यकर्त्यानी प्रयत्न केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी जोशी यांनी केले. कार्यक्रमास राजू मामा जाधव व माजी नगरसेवक अ‍ॅड. धनंजय जाधव यांनी सहकार्य केले.