आयकॉन पब्लिक स्कूलमध्ये दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

0
22

नगर – शरद मुथा एज्युकेशन ट्रस्ट संचालित द आयकॉन पब्लिक स्कूलमधील सीबीएसई बोर्ड परीक्षा देणार्‍या इयत्ता १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात पार पडला. शाळेला निरोप देताना विद्यार्थी शालेय जीवनातील गोड आठवणीत रममाण झाले होते. विविध संगीत, नृत्य सादरीकरण, आठवणींना उजाळा आणि मनोरंजन वातावरणात निरोप समारंभ पार पडला. विद्यार्थी आणि शिक्षकांनी एकत्र फोटो सेशन करून चिरंतन आठवणींचा ठेवा साकारला. शाळेच्या संचालिका आराधना राणा आणि मुख्याध्यापिका दीपिका नगरवाला यांनी विद्यार्थ्यांना भावी शैक्षणिक आयुष्यात आणि करियर मध्ये दैदीप्यमान यश मिळवत शाळेचा, कुटुंबाचा नावलौकिक उंचावण्यासाठी प्रयत्न करावा असे मार्गदर्शन केले. इयत्ता १० आणि १२ च्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभ हा एक संस्मरणीय करणारा प्रसंग होता, जो एका प्रवासाचा शेवट आणि दुसर्‍या प्रवासाची सुरूवात होता. हे शिक्षणाच्या प्रभावाची आणि शालेय समुदायामध्ये निर्माण झालेल्या बंधांची आठवण करून देणारे ठरले.