नगरमध्ये गोमांस विक्री करताना तिघांना पकडले; कोतवाली व तोफखाना पोलिसांची कारवाई

0
87

नगर – राज्यात गोवंशीय जनावरांची कत्तल करण्यास आणि गोमांस विक्री करण्यास बंदी असतानाही नगर शहरात खुलेआम कत्तलखाने सुरु असून कोतवाली व तोफखाना पोलिसांनी ३ ठिकाणी कारवाई करत गोमांस विक्री करताना तिघांना पकडले आहे. बुधवारी (दि.२७) दुपारी या कारवाया करण्यात आल्या आहेत. तोफखाना पोलिसांनी रामवाडी परिसरातील मांगीरबाबा मंदिराजवळ असलेल्या २ गाळ्यांमध्ये कारवाई करत त्या ठिकाणी ९० किलो गोमांस, लोखंडी सत्तूर, वजनकाटे असा १९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या बाबत पो.कॉ. सुमित गवळी यांच्या फिर्यादी वरून गौस अजम अब्दुल रऊफ कुरेशी (रा. बाबा बंगाली) याच्यावर तर पो.कॉ.सतीश त्रिभुवन यांच्या फिर्यादीवरून सोहेल मोहंमद शरीफ कुरेशी (रा. सुभेदार गल्ली, रामचंद्र खुंट) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तर कोतवाली पोलिसांनी झेंडीगेट जवळील हॉटेल मीराच्या पाठीमागे ५० हजार रुपये किमतीचे २५० किलो गोमांस पकडले आहे. या प्रकरणी पो.कॉ. सुरज कदम यांच्या फिर्यादी वरून सोहेल जावेद कुरेशी (रा. व्यापारी मोहल्ला, झेंडीगेट) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.