बाबासाहेब वाकळे यांना आदर्श महापौर पुरस्कार प्रदान

0
44

नगर – तालुयातील निमगाव वाघा येथील नवनाथ वारकरी संस्थेच्या वतीने ह भ प विठ्ठल महाराज फलके यांच्या हस्ते बाबासाहेब वाकळे यांना आदर्श महापौर पुरस्कार देत सपत्नीक सन्मान करण्यात आला. हभप विठ्ठल महाराज फलके म्हणाले की, बाबासाहेब वाकळे यांनी शहर विकासाच्या कामाबरोबरच धार्मिकता वाढीसाठी काम उभे केले आहे. सावेडी गावामध्ये संत तुकाराम महाराज यांचे मंदिर उभे करून गेल्या २५ वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताहचे आयोजन केले जात आहे. तसेच सावेडी गावातील मंदिरांसमोर सभा मंडपाची उभारणी केली असल्यामुळे नागरिक वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करत असतात, त्यामुळे समाज जोडला जात आहे. बाबासाहेब वाकळे यांचे समाजाप्रती सुरू असलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले. बाबासाहेब वाकळे म्हणाले की, नवनाथ वारकरी संस्थेच्या वतीने देण्यात आलेला आदर्श महापौर पुरस्कार हा प्रेरणा देणारा असून काम करण्याची ऊर्जा वाढवणारा आहे संत तुकाराम महाराज यांचे मंदिर उभे केले त्या माध्यमातून धार्मिकतेचे काम केले जात आहे प्राप्त पुरस्कारामुळे जबाबदारी वाढली असून चांगले काम उभे करू असे ते म्हणाले.