नगरमधील मुद्रांक जिल्हाधिकारी व दुय्यम निबंधक कार्यालय २९ ते ३१ मार्चला शासकीय सुट्टीच्या दिवशीही खुली राहणार

0
66

नगर – वार्षिक बाजार मूल्य तक्ते दरवर्षी १ एप्रिल रोजी प्रसिद्ध होत असतात. त्यामुळे दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीसाठी मार्च महिन्यात मोठी गर्दी होते. तसेच यंदाच्या वर्षी २०२३-२४ मध्ये महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना राबविण्यात येत आहे. या संबंधीचे कामकाज आणि दस्त नोंदणीसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन मार्च २०२४ मध्ये राज्यातील सर्व मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय व दुय्यम निबंधक कार्यालये शासकीय सुट्टीच्या दिवशीही खुली राहणार आहेत. राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक हिरालाल सोनावणे यांनी सदर आदेश जारी केले आहेत. त्यानुसार मार्च २०२४ मध्ये २९ मार्चला गुडफ्रायडे, ३० मार्च शनिवार तसेच ३१ मार्च रविवारी शासकीय सुट्टीच्या दिवशीही संबंधित कार्यालये शासकीय सुटी असली तरी खुली राहणार आहेत. या निर्णयामुळे दस्त नोंदणीसाठी नागरिकांना पुरेसा वेळ मिळणार असून त्यांना शासकीय सुट्टीच्या दिवशीही दस्त नोंदणी करता येणार आहे. शासकीय आदेशानुसार नगर जिल्ह्यातील मुद्रांक जिल्हाधिकारी व दुय्यम निबंधक कार्यालये खुली राहणार आहेत. याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सह जिल्हा निबंधक पी. जी. खोमणे यांनी केले आहे.