कार व ट्रॅक्टरच्या समोरासमोर धडकेत एकाचा जागीच मृत्यू

0
30

नगर-सोलापूर महामार्गावरील एकेरी वाहतुकीचा आणखी एक बळी; ओव्हरटेक करताना घडली घटना

नगर – नगर-सोलापूर महामार्गावर दरेवाडीजवळ तुक्कड ओढ्याच्या पुढे सुरु असलेल्या उड्डाणपुलाच्या कामामुळे एकेरी वाहतूक सुरु असताना ट्रॅटरने दुसर्‍या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून आलेल्या मारुती स्विफ्ट कारला जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात कार चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि. २६) रात्री १० च्या सुमारास घडली. प्रमोद विष्णु कवळे (वय ३५, रा. नागलवाडी, ता. कर्जत) असे मयताचे नाव आहे. मयत कवळे हे आपल्या मारुती स्विफ्ट कारने मंगळवारी (दि. २६) नगरमध्ये एका हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी आले होते. नगर हून पुन्हा ते गावाकडे जात असताना दरेवाडीजवळ तुक्कड ओढ्याच्या पुढे उड्डाणपुलाच्या कामामुळे एकेरी वाहतूक सुरु होती. ते जात असताना समोरून नगरच्या दिशेने येणार्‍या एका ट्रॅटरने दुसर्‍या वाहनाला ओहरटेक करण्याच्या नादात कारला जोराची धडक दिली. या धडकेत कार चालवत असलेले कवळे हे गंभीर जखमी झाले. त्यांना त्यांच्या नातेवाईकांनी उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र डॉटरांनी त्यांना मयत घोषित केले. या प्रकरणी डॉटरांनी दिलेल्या खबरेवरून पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मयत यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, २ मुले, १ मुलगी, असा परिवार आहे.