अहमदनगर महानगर पालिका कामगार युनियनच्या प्रभारी अध्यक्षपदी जितेंद्र सारसर व बाबासाहेब मुदगल

0
28

मनपा कामगार संघटनेने कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावावे : आ. संग्राम जगताप

नगर – महापालिका कामगार युनियनचे पदाधिकारी यांची श्रमिक कार्यालय येथे जनरल सेक्रेटरी आनंद वायकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. सदर बैठकीमध्ये कामगार युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी घरगुती कारणास्तव अध्यक्षपदावर काम करण्यास इच्छुक नसलेबाबत काही पदाधिकारी यांच्यासमोर भावना व्यक्त केल्यामुळे व महापालिका कामगारांचे कोणतेही प्रश्न प्रलंबित राहता कामा नये अशी भावना अनेक पदाधिकारी यांनी मांडली. सध्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता सुरू असल्यामुळे कामगार युनियनची सर्वसाधारण सभा आयोजित करणे शय नसल्याने तसेच कामगार युनियनचे सरचिटणीस आनंदराव वायकर यांच्याकडे महापालिकाबरोबर राज्य साखर कामगारांचे देखील काम असल्यामुळे अध्यक्षपद जास्त काळ रिक्त ठेवणे उचित होणार नाही. त्यामुळे सर्व पदाधिकारी यांनी घटनेतील तरतुदीनुसार एकमुखाने जितेंद्र सारसर व बाबासाहेब मुदगल यांची महापालिका कामगार युनियन प्रभारी अध्यक्ष म्हणून तात्पुरत्या स्वरूपात निवड करण्यात आलेली आहे.

यावेळी कार्याध्यक्ष दीपक मोहिते, नंदू नेमाने, राहुल ससाने, बलराज गायकवाड, महादेव कोतकर, उपाध्यक्ष प्रकाश साठे, विजय कोतकर, अंतवन क्षेत्रे, सागर साळुंखे, अमोल लहारे, बाळासाहेब व्यापारी, अजित तारू, सखाराम पवार, बाबासाहेब राशिनकर, राजू वाघमारे, बैजू साठे, प्रफुल्ल लोंढे, अजय सौदे आदी उपस्थित होते. अहमदनगर मनपा कामगार युनियनच्या प्रभारी अध्यक्षपदी जितेंद्र सारसर व बाबासाहेब मुदगल यांची निवड झाल्याबद्दल आ. संग्राम जगताप यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी आ. जगताप म्हणाले की महापालिका कर्मचार्‍यांचे दैनंदिन विविध प्रश्न असतात ते सोडवण्याचे काम संघटनेने करावे मनपा कर्मचारी हे नगर शहरातील स्वच्छता, आरोग्य, पाणीपुरवठा, दिवाबत्ती आधी मूलभूत प्रश्नांपासून कामे मार्गी लावत असतात त्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लागणे गरजेचे आहे. प्रभारी अध्यक्षांनी मनपा अधिकारी कर्मचारी यांचे प्रश्न मार्गी लावावे.