शिर्डी लोकसभा मतदारसंघातून भाऊसाहेब वाकचौरेंना उमेदवारी

0
21

मुंबई – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने पहिली लोकसभा उमेदवार यादी जाहीर केली आहे. १७ उमेदवारांची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे खासदार असलेल्या कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघात अद्याप एकाही उमेदवाराची घोषणा झालेली नाही. ठाकरे गटाची लोकसभा उमेदवार यादी दक्षिण मुंबई – अरविंद सावंत, दक्षिण मध्य मुंबई – अनिल देसाई, उत्तर पश्चिम (वायव्य) मुंबई – अमोल कीर्तिकर, उत्तर पूर्व (ईशान्य) मुंबई – संजय दिना पाटील, ठाणे – राजन विचारे, रायगड – अनंत गिते, रत्नागिरी सिंधुदुर्ग – विनायक राऊत, धाराशिव – ओमराजे निंबाळकर. परभणी – संजय जाधव, छत्रपती संभाजीनगर – चंद्रकांत खैरे, हिंगोली – नागेश पाटील आष्टीकर, सांगली – चंद्रहार पाटील, मावळ – संजोग वाघेरे, नाशिक – राजाभाऊ वाजे, शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे, बुलढाणा – नरेंद्र खेडेकर, यवतमाळ वाशिम – संजय देशमुख