मनसेने नितीन भुतारे यांच्यावर चुकीच्या पद्धतीने केलेल्या कारवाईचा ओबीसी समाजाकडून निषेध

0
36

नगर – मनसेचे नेते नितीन भुतारे यांच्यावर पक्षाने चुकीच्या पद्धतीने कारवाई केल्यामुळे सकल ओबीसी समाजाच्यावतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. माळीवाडा वेस येथील महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. नितीन भुतारे यांनी भारतीय जनता पक्षाचे लोकसभेचे उमेदवार खा. सुजय विखे पाटील यांच्या विरोधात भूमिका मांडल्यामुळे तसेच सर्वसामान्य जनतेच्या बाजूने भूमिका घेतल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्यांच्यावर कुठलीही चुक नसताना कारवाई केली. हा अन्याय ओबीसी समाज सहन करणार नाही. सर्व ओबीसी समाज नितीन भुतारे यांच्या पाठीमागे उभा आहे. सत्य व परखड भूमिका घेणे हे नितीन भुतारे यांचे काम आहे व ते सातत्याने करत आले. त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न कोणी केला तर सकल ओबीसी समाज सहन करणार नाही, असे भरत गारुडकर म्हणाले. मनसेने ही कारवाई कोणाच्या सांगण्यावरून केली हे सर्व जनतेला माहीत असून आगामी निवडणुकीमध्ये त्याचे पडसाद निश्चित उमटतील असे ओबीसी पदाधिकारी सांगत होते यावेळी बाळासाहेब बोराटे, दत्ता जाधव, परेश लोखंडे, राजेंद्र पडोळे, सुरेश चिपाडे, रमेश सानप, सागर फुलसौंदर, मंगेश खंगले, बाबा पटवेकर, कैलास दळवी, रोहित पठारे, लवेश गोंधळे, माऊली गायकवाड, अनिल इवळे, सुनील भिंगारे, बनकर रमेश, चिपाडे कॅप्टन, सुधीर पुंड, इंजि. चंद्रकांत पुंड, जालिंदर बोरुडे, अमोल भांबरकर, दीपक खेडकर, गणेश बनकर, सुरेश आंबेकर, गणेश कोल्हे, भाऊसाहेब कोल्हे, ब्रिजेश ताठे, विशाल वालकर, मनोज गाडळकर उपस्थित होते.