भिंगारमध्ये मोटारसायकल चोराला सापळा लावून पकडले

0
44

मोटारसायकल चोरणारा एक सराईत चोरटा भिंगार कॅम्प पोलीसांनी नगर – पाथर्डी रोडवर भिंगार नाला येथे पकडला आहे. प्रविण छगन भोसले (वय २२, रा. नेवासा फाटा, ता नेवासा) असे त्याचे नाव असून त्याच्याकडून चोरीची होंडा कंपनीची शाईन मोटारसायकल हस्तगत करण्यात आली आहे. शुक्रवारी (दि.२२) सायंकाळी ही कारवाई करण्यात आली आहे. भिंगार कॅम्प् पोलीस स्टेशनचे स.पो.नि. योगेश राजगुरु यांना गोपनिय माहिती मिळाली की, भिंगार नाल्यावरुन पाथर्डीकडे एक इसम विनानंबरची काळया रंगाची चोरीची शाईन मोटारसायकल घेवुन जाणार आहे. ही माहिती मिळताच त्यांनी तात्काळ तपास पथकातील अंमलदारांना कारवाई साठी पाठविले. या पथकाने भिंगार नाल्यावर जावून सापळा लावून थांबलेले असताना नगर शहराकडून भिंगारकडे एका मोटारसायकलवर संशयित इसम येताना दिसला. पथकाने त्यास थांबवून त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव प्रविण छगन भोसले असे असल्याचे सांगीतले. त्यास त्याचे ताब्यातील मोटारसायकल बाबत विचारपुस करता त्याने समाधानकारक उत्तरे दिले नाही. त्यास अधिक विश्वासात घेवून पुन्हा चौकशी करता त्याने त्याचे ताब्यात असलेली शाईन मोटारसायकल ही पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीतून चोरी केल्याचे कबुल केले. तपास पथकाने त्यास ताब्यात घेवून पोलीस स्टेशनला आणून पाथर्डी पोस्टे येथे खात्री केली असता सदर मोटारसायकल चोरीबाबत पाथर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे त्यास पाथर्डी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कारवाई स. पो. नि. योगेश राजगुरु यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस अंमलदार संदिप घोडके, दिपक शिंदे, संदिप थोरात, कैलास शिरसाठ यांच्या पथकाने केली आहे