मंदिरे समाजासाठी संस्कार, सेवा, शक्ती केंद्र

0
56

याप्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे नगर विभागमंत्री सुनील खिस्ती, जिल्हामंत्री गजेंद्र सोनवणे, धर्मप्रसार विभाग प्रमुख शरद नगरकर, अमोल भांबरकर, शहर मंत्री श्रीकांत नांदापूरकर, मंदिर अर्चक पुरोहित संपर्क प्रमुख अ‍ॅड.जयदीप देशपांडे, श्री. देशमुख, मंदिर नगर – अनेक मंदिरातून समाज सेवेचे कार्य घडत आहे. पुजारींच्या द्वारे आजही अनेक प्रमुख मंदिरामध्ये पंचारती होते. अशा भावपूर्ण पुजेमुळे जागृत मंदिर म्हणून आज अनेक भक्त दर्शनासाठी येतात. सुसंपन्न मदिरांचा उपयोग समाजासाठी झाला पाहीजे. ज्या मंदिरामध्ये मोकळी जागा आहे.त्या ठिकाणी गोसेवेचे कार्य, अन्नदान सुरू आहे. मंदिरे ही समाजासाठी संस्कार, सेवा, शक्ती यांचे केंद्र आहे, असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सह मंत्री अरुण नेटके यांनी केले आहे. टिळक रोड येथील पटेल मंगल कार्यालयात विश्व हिंदू परिषद आयोजीत मंदिर, अर्चक, पुरोहीत आयामाच्या वर्गासाठी संगमनेर, राहुरी, पारनेर, कर्जत, जामखेड, श्रीगोंदा, पाथर्डी, शेवगाव, अकोले आदी तालुयातील मंदिर विश्वस्त उपस्थित होते. याप्रसंगी मंदिर विश्वस्तांना अरुण नेटके यांनी मार्गदर्शन केले. विश्वस्त व प्रतिनीधी म्हणून सौ.प्रमिला दुमाटे, श्रीमती शांती शर्मा, अनुराधा खोसे, सौ. शीला सराफ, सौ.विद्या कुलकर्णी, दिपक राहाणे, काळाराम चत्तर, अमोल कोहोक, पांडूरंग व्यवहारे, संदीप ढोरजकर, समीर पाठक, राजेंद्र सरगड, रामनाथ दातीर, बाळासाहेब आहेर, गणेश पलंगे, हेमंत पितळे, उमेश देशमुख, अंबादास गोसावी, रवी राठोड, अतुल खैरे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अ‍ॅड.सीताराम दाणी, अ‍ॅड. शिवराम रोटे, अ‍ॅड.निलेश हराळ, जयदीप फंड, सत्यम नामदे यांनी परीश्रम घेतले. आभार जयदिप देशपांडे यांनी मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.