कापूरवाडी शिवारातील गावठी दारूभट्यांवर पोलिसांचे छापे

0
40

नगर – नगर तालुयातील कापूरवाडी शिवारात अवैधरित्या सुरु असलेल्या गावठी दारूभट्ट्यांवर भिंगार कॅम्प पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी (दि.२२) छापेमारी करत तयार दारू, कच्चे रसायन व इतर साहित्य असा १ लाख १९ हजारांचा मुद्देमाल नष्ट करून दोघांवर गुन्हे दाखल केले आहेत. भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरू यांना गोपनिय माहिती मिळाली की कापुरवाडी शिवारात मोरे वस्ती येथे घराचे भिंतीचे आडोशाला गावठी दारूभट्ट्या सुरु आहेत. ही माहिती मिळाल्याने त्यांनी पोलिस पथकाला कारवाई साठी पाठविले. या पथकाने त्या ठिकाणी जावून छापा मारला. त्या ठिकाणी पोलीसांना पाहताच पळून जाण्याचे तयारीत असतांना त्यांचा पाठलाग करून दोघांना पकडले. संतोष गोवर्धन पवार (वय ३८), लहु गोवर्धन पवार (वय ५०, दोघे रा गोपाळ वस्ती, कापुरवाडी शिवार, ता.नगर) अशी त्यांची नावे आहेत. त्या दोघांच्या ताब्यातून १०० लिटर गावठी हातभटटीची तयार दारू, २ हजार १०५ लिटर गावठी हातभटटी दारू तयार करण्यासाठी लागणारे कच्चे रसायन, १३ लिटर जळके रसायन व साहित्य मिळुन आले आहे. सदर आरोपी विरुध्द भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (फ) (क) (ड) (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई स.पो.नि. योगेश राजगुरु यांचे मार्गदर्शना खाली पो.हे.कॉ.अजय नगरे, गणेश साठे, विभीषण दिवटे, रघुनाथ कुलांगे, रेवन्नाथ मिसाळ, बबन बेरड, पो.कॉ.उंडे यांनी केली आहे