चांगल्या विचारासाठीसर्वांनी एकत्र येऊन कुटुंब व्यवस्थेवर चर्चा केली पाहिजे : ह भ प अक्षय महाराज उगले

0
30

समाजामध्ये आपण वावरत असताना संत महंताच्या विचाराने जगावे, देवाची व संतांची समाजावर कृपाअसते देवाच्या रूपात मोठी ताकद असून यासाठी कोणाचीही निंदा करू नका देवाचे नामस्मरण करून आनंदी जीवन जगा, सध्याच्या युगामध्ये एकत्रित कुटुंब व्यवस्था राहिली नसल्यामुळे चांगल्या विचारांची चर्चा होत नाही, यासाठी सर्वांनी एकत्र येऊन कुटुंब व्यवस्थेवर चर्चा केली पाहिजे, बापाचे दुःख सर्वात आधी आपल्या मुलींना कळत असते आई,बहिण व बाप आपल्याबरोबर असल्यावर आपल्याला दुःख मिळणार नाही, मुक्ताबाई जर जन्माला आल्या नसत्या तर आपल्याला ज्ञानोबा दिसले नसते, आजचा युवक व्यसनाधीनतेकडे आकर्षित होत आहे तरी त्याला संतांच्या विचाराची खरी गरज असून योग्य मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे. समाजाने एकत्रित येऊन पर्यावरण संतुलनासाठी काम करावे यासाठी वृक्षारोपण व संवर्धन ही लोकचळवळ उभी करावी असे प्रतिपादन ह भ प युवा कीर्तनकार अक्षय महाराज उगले यांनी केले. जगद्गुरु संत तुकाराम महाराज प्रतिष्ठान सावेडी माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह व गाथा पारायण सोहळ्यानिमित्त ह भ प अक्षय महाराज उगले यांचे कीर्तन झाले. यावेळी भाविक वर्ग उपस्थित होते संत तुकाराम महाराज यांनी त्यांच्या काळात वृक्षवल्ली आम्हां सोयरे वनचरे, या अभंगातून वृक्षांचे पटवून दिलेले महत्व समाजाला आज कळत आहे, तरी प्रत्येक व्यक्तीने मोठ्या संख्येने वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन करावे असे ह भ प अक्षय महाराज उगले यांनी सांगितले