नगरकरांच्या प्रेमाच्या वर्षावाने भारावून गेले : पंकजा मुंडे

0
24

नगर – लोकसभेच्या निवडणुकीसाठी मोठा अवधी मिळाला आहे. हळूहळू निवडणुकीचे वातावरण तापण्यास सुरुवात होईल. भारतीय जनता पार्टी व मित्रपक्ष देशात चारशेचा आकडा पार करण्याबरोबरच राज्यातही महायुती मोठा विजय मिळवेलच असा विश्वास पंकजा मुंडे यांनी व्यक्त करत माझे वडील स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या प्रमाणे माझ्यावरही नगरकरांनी कायमच भरपूर प्रेम केले आहे. या प्रेमाच्या वर्षावाने मी भारावून गेले आहे. निवडणुकीसाठी ज्येष्ठ बंधू महेंद्र गंधे यांनी शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद, असे सांगितले. पंकजा मुंडे यांनी गुरवारी रात्री नगर शहराला धावती भेट दिली. शहरात त्यांचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले. विधानसभा निवडणूक प्रमुख महेंद्र गंधे यांच्या निवासस्थानी पंकजा मुंडे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी भैय्या गंधे व सौ.मीनल गंधे यांनी त्यांचे स्वागत करून सत्कार केला. यावेळी पदाधिकारी उपस्थित होते. महेंद्र गंधे यांनी पंकजा मुंडे यांना लोकसभा निवडणुकीसाठी शुभेच्छा देताना सांगितले, यांना पक्षाने बीड मधून उमेदवारी जाहीर केली आहे. या निवडणुकीत त्यांचा मोठ्या मताधियाने विजय निश्चित असून भाजपच्या केंद्रातील नव्या सरकारमध्ये त्या कॅबिनेट मंत्री होतील, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी ज्ञानेश्वर काळे, तुषार पोटे, बाबासाहेब सानप, नरेंद्र कुलकर्णी, डॉ.ज्ञानेश्वर दराडे, राजू मंगलारप, वसंत राठोड, रेखा विधाते, प्रिया जानवे, श्वेता पंधाडे, कालिंदी केसकर, सविता कोटा, रेणुका करंदीकर, लक्ष्मिकांत तिवारी, किशोर कटोरे, ऋग्वेद गंधे, सुजाता औटी, ममता सपकाळे, गोकुळ काळे, महावीर कांकरिया, शशांक कुलकर्णी, सुमित बटूळे, श्रीकांत फंड आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.