जिल्ह्यात शस्त्र बाळगण्यास मनाई

0
36

नगर – भारत निवडणूक आयोगाने १६ मार्च २०२४ रोजी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा केली आहे. अहमदनगर लोकसभा मतदार संघ (३७) व शिर्डी लोकसभा मतदारसंघात (३८) येथे १३ मे रोजी मतदान होणार आहे. निवडणुक मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडल्या जावी यासाठी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी त्यांना प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करत फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार १६ मार्च ते ६ जुन या निवडणुकीच्या कालावधीमध्ये कोणत्याही इसमास शस्त्र परवान्यावरील शस्त्रे जवळ बाळगुन फिरण्यास सार्वजनिक ठिकाणी बाळगण्यास मनाई आदेश जारी केले आहेत.