भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा शहर जिल्हा सचिवपदी धिरज पडोळे यांची निवड

0
27

नगर – भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात ओबीसी मोर्चाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत ओबीसी मोर्चाचे शहर जिल्हा सचिव पदाचे नियुक्ती पत्र धिरज अर्जुन पडोळे यांना शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. याप्रसंगी प्रदेश सदस्य वसंत लोढा, ओबीसी मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, उपाध्यक्ष बाबासाहेब भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा शहर जिल्हा सचिवपदी धिरज पडोळे यांना नियुतीपत्र देताना शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर. सानप, सरचिटणीस सचिन पारखी, महेश नामदे, ओबीसी मोर्चाचे विधानसभा प्रमुख गोपाल वर्मा, प्रशांत मुथा, भटया विमुक्त आघाडीचे सचिन कुसळकर, युवा मोर्चाचे अध्यक्ष मयूर बोचूघोळ, वकील आघाडीचे अध्यक्ष चंदन बारटक्के, मध्यनगर मंडल अध्यक्ष विक्रम शिंदे, प्रकाश सैंदर, उपाध्यक्ष बाळासाहेब खताडे, विनोद भिंगारे, सरचिटणीस सचिन पावले, राजू मंगलारप आदी उपस्थित होते. धिरज पडोळे म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून संघटनात्मक काम करत असुन समाजातील शोषित, पिडीत, वंचित आणि मजूर घटकांना न्याय देण्याच्या दृष्टीने आणि विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काम करेल. तसेच पक्षाने माझ्यावर जो विश्वास दाखविला आहे. तो सार्थ ठरविण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करेल.