रेल्वे संदर्भातील समस्यांबाबत नागरिकांनी सूचना पाठवाव्यात

0
20

नगर – रेल्वे संबंधित काही अडचणी असतील तसेच रेल्वे स्थानकावर बसण्याची, पाण्याची, शौचालयाची सोय उपलब्ध करून देण्याबाबत नागरिकांना माहिती द्यावी. स्वत:चे उत्पादन तयार करणार्‍यास रेल्वे स्थानकावर एक स्टॉल, शिल्पकार व मूर्ती तयार करणार्‍यांसही एक स्टॉल देण्याबाबत शिफारस करण्यात येत आहे. विकसित भारत संकल्पनेद्वारे पंतप्रधान यांना पत्राद्वारे नागरिक सुचना पाठवू शकातात. त्यासाठी भाजपच्या महाराष्ट्र रेल्वे प्रवासी प्रकोष्ठचे जिल्हाध्यक्ष अनिल सबलोक यांच्या ऑफिसवर पत्रपेटी ठेवलेली आहे. नागरिकांनी पाठविलेल्या सूचना भाजपाच्या जाहीरनाम्यामध्ये समाविष्ट केल्या जातील. संबंधित सुचना पार्टीच्या कार्यालयात, नगरसेवक व पदाधिकारी यांचेकडे आणून दिल्या तरी चालतील. तसेच ९०९०९०२०२४ या नंबरवर मिसकॉल देऊन आपल्या सूचना पाठवू शकता. याबाबत अधिक माहितीसाठी अनील सबलोक (मो.नं.९४०५५७०२०६).