शिवसेना (ठाकरे गट) विभागप्रमुखपदी सागर थोरात यांची नियुक्ती

0
38

नगर – भाजपाने गेल्या काही दिवसांपासून फोडा झोडा आणि राज्य करा अशी निती अवलंबली आहे. त्यांनी ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांनाच बरोबर घेतले. भाजपाची वॉशिंग मशिन सध्या जोरात आहे. परंतु त्यांच्या या कुरघोडीच्या राजकारणाला जनता वैतागली आहे, त्यामुळे सर्वसामान्य हे शिवसेनेच्या मागे आहेत. सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी शिवसेनेने नेहमीच पुढाकार घेतला आहे. नगरमध्ये शिवसेनेची चांगली ताकद आहे, शिवसेना (ठाकरे गट) विभागप्रमुखपदी सागर विष्णू थोरात यांची नियुक्ती करुन संपर्कप्रमुख आ.सुनिल शिंदे यांच्या हस्ते पत्र देण्यात आले. याप्रसंगी शहरप्रमुख संभाजी कदम, दत्ता जाधव, शिवाजीराव कदम, रावजी नांगरे, अण्णा घोलप आदि. त्यामुळे पक्षात येणार्‍या युवकांना पदाच्या माध्यमातून जनसेवेची संधी मिळत आहे. पक्षाने दिलेल्या पदाचा उपयोग जनतेच्या प्रश्न सोडविण्यासाठी करावा. पक्षाच्यावतीने आपणास सर्वोतोपरि सहकार्य केले जाईल, असे प्रतिपादन शिवसेना संपर्कप्रमुख आ.सुनिल शिंदे यांनी केले. शिवसेना (ठाकरे गट) विभागप्रमुखपदी सागर विष्णू थोरात यांची नियुक्ती करुन संपर्कप्रमुख आ.सुनिल शिंदे यांच्या हस्ते पत्र देण्यात आले. याप्रसंगी शहरप्रमुख संभाजी कदम, दत्ता जाधव, शिवाजीराव कदम, रावजी नांगरे, अण्णा घोलप आदि उपस्थित होते. याप्रसंगी संभाजी कदम म्हणाले, नगरमधील जनता ही नेहमीच शिवसेनेच्या मागे उभी राहिली आहे. नागरिकांच्या प्रश्नांसाठी घेतलेल्या पुढाकारामुळे जनतेला ती आपलीशी वाटते. त्यामुळे युवक-नागरिक यांची शिवसेनेशी नाळ जुळलेली आहे. शिवसैनिकांच्या कामानुसार त्यांच्यावर जबाबदारी देण्यात येत आहे. सागर थोरात यांनी युवकांचे चांगले संघटन केले असल्याने त्यांच्यावर पदाच्या माध्यमातून जबाबदारी सोपविण्यात आली असल्याचे सांगितले. नियुक्तीनंतर सागर थोरात म्हणाले, शिवसेनेची जनतेशी नेहमीच बांधिलकी राहिली आहे, नागरिकांच्या प्रश्नांसाठी पुढाकार घेणार पक्ष असल्याने पक्षात काम करतांना जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. आता दिलेल्या पदाच्या माध्यमातून चांगले काम करुन पक्षाचे कार्य अधिक व्यापक करु, असे सांगितले.