साडी आणि साड्यांची खरेदी हा महिलांचा आवडीचा विषय शितलताई जगताप

0
29

नगर – साडी आणि साड्यांची खरेदी हा महिलांचा आवडीचा विषय. एखाद्या समारंभात किंवा प्रवासातही महिला आपल्या साडीबरोबरच अन्य महिलांच्या साड्यांवर आवडीने चर्चा करतात. कोणती साडी अंगावर छान खुळेल याचाच प्रयत्न प्रत्येक महिलांचा असतो. मग साड्यांचे वेगवेगळे कलेशनसाठी ती चोखंदळ राहून साडी निवडत असते. धार्मिक परीक्षा बोर्ड येथे भरविण्यात आलेले साड्यांचे प्रदर्शन महिलांसाठी पर्वणी ठरणार असल्याचे प्रतिपादन माजी नगरसेविका शितलताई जगताप यांनी केले. पुष्कर (राजस्थान) येथील एपिस साडीच्या वतीने धार्मिक परीक्षा बोर्ड येथे लावण्यात आलेले आऊटलेट व आनंद मंगल कार्यालयातील साडी प्रदर्शनाचे उद्घाटन शितलताई जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी अलकाताई मुंदडा, मिनाताई मुनोत, अपेक्षा संकलेचा, मंगल बोरा, डॉ. हेमा सुराणा, जयाताई गायकवाड, एपिसचे संचालक पियुष जैन, प्रमिला चंगेडिया, उषा सोनी, नैना मुथा, निलिमा पवार आदी उपस्थित होत्या. मीनाताई मुनोत म्हणाल्या की, साडी भारतीय संस्कृती व सभ्यता दर्शवते. अनेक उच्च पदावर गेलेल्या महिला आजही साडी परिधान करतात, ही आपली भारतीय संस्कृतीची सभ्यता असल्याचे त्यांनी सांगितले. तर आनंदधाम येथे श्री आनंदऋषीजी महाराज यांच्या ३२ व्या स्मृतिदिनानिमित्त सुरु असलेल्या विविध कार्यक्रमामुळे येणार्‍या महिला वर्गाला साडीचे प्रदर्शन पाहता येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पियुष जैन म्हणाले की, ग्राहकांच्या आग्रहास्तव यावर्षी देखील पुष्कर येथून महिलांसाठी विविध साड्यांचे प्रकार एपिसच्या माध्यमातून घेवून आलो आहोत. आठ दिवस हे प्रदर्शन असणार आहे. मोजया साड्यांचे स्टॉल आनंदधाम समोर लावण्यात आले असून, सर्व साड्यांचे प्रदर्शन आनंद मंगल कार्यालयात पाहण्यासाठी खुले आहे. यामध्ये डिजायनर, ट्रॅडिशनल आदी विविध साड्यांसह ब्रायडल लहेंगा आणि रेडिमेड सुट्सचा समावेश असल्याची माहिती त्यांनी दिली.