नगर तालुक्यात गावठी दारू भट्टयांवर छापे

0
23

नगर – लोकसभा निवडणुकीच्या . पार्श्वभूमीवर नगर तालुका पोलिसांनी तालुयात ठिकठिकाणी असलेल्या अवैध दारू धंद्यांच्या विरोधात कारवाईची मोहीम सुरु केली असून साकत गाव व परिसरात ४ ठिकाणी सुरु असलेल्या गावठी दारू भट्ट्यांवर छापे मारत १ लाख ६२ हजारांचे साहित्य, तयार दारू व कच्चे रसायन केले नष्ट केले आहे. साकत गावच्या शिवारात गावठी दारूच्या भट्ट्या राजरोस पणे सुरु असल्याची माहिती स.पो.नि. प्रल्हाद गिते यांना मिळाली होती. त्यामुळे त्यांनी तात्काळ पोलिस पथकासह जावून छापेमारी केली. दारू भट्टी चालविणार्‍या सोमनाथ नारायण पवार याच्या भट्टीवर छापा टाकत ३६ हजार रुपये किंमतीची गावठी हातभट्टी तयार दारू व कच्चे रसायन नष्ट केले. दुसरी कारवाई साकत गावच्या शिवारात हरिभाऊ मौला पवार याच्या भट्टीवर केली. तेथे ३८ हजार रुपये किमतीचे हातभट्टी दारू तयार करण्याचे साहित्य नष्ट करण्यात आले. तिसरी कारवाई साकत गावाच्या शिवारात सीना नदी पात्रात सोपान हरिभाऊ पवार याच्या भट्टीवर करत ४२ हजार रुपये किमतीचे हातभट्टी दारू तयार करण्याचे साहित्य नष्ट करण्यात आले. चौथी कारवाई साकत गावच्या शिवारात आकाश महिपती पवार याच्या घराच्या परिसरात करण्यात आली तेथे ४६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल कच्चे रसायन व गावठी हातभट्टी तयार दारू साहित्य मिळून आल्याने ते नष्ट करण्यात आले. सदर चारही आरोपी विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई)(फ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, नगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक संपतराव भोसले यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते, पोलीस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे, पोलिस अंमलदार भरत धुमाळ, शेख, खरात, पालवे, विक्रांत भालसिंग, जायभाय, शिंदे, गोरे, संभाजी बोराडे, खेडकर, शिरसाट यांच्या पथकाने केली आहे.