दिल्लीगेट परिसरातील व्यावसायिकाला २ जणांकडून मारहाण; गुन्हा दाखल

0
25

 

नगर – खुन्नसने पाहिले म्हणत दोघांनी व्यावसायिकाला दुचाकीच्या रिमने मारहाण करून जखमी केले. प्रमोद माधवराव दळवी (वय ५५, रा. चौपाटी कारंजा, नालेगाव) असे जखमी व्यावसायिकाचे नाव आहे. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांनी उपचारादरम्यान दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्यन राजेश कुलकर्णी (रा. देशमुख गल्ली, चौपाटी कारंजा) व त्याच्या सोबत असलेल्या एका अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दळवी यांचे दिल्लीगेट परिसरातील मोहन बाग येथे दुचाकी दुरूस्तीचे गॅरेज आहे. ते बुधवारी (दि. २०) दुपारी साडेचारच्या सुमारास गँरेजवर असताना तेथे आर्यन व त्याच्या सोबत एक अनोळखी व्यक्ती दुचाकीवरून आले. दळवी यांनी त्यांच्याकडे पाहिले असता आर्यन त्यांना म्हणाला,‘खुन्नसने काय पाहतो’, तेव्हा दळवी म्हणाले, ‘खुन्नसने पाहायचे काय कारण, मी तुम्हाला खुन्नसने पाहिले नाही’, त्यानंतर आर्यन व त्याच्या सोबतच्या व्यक्तीने दळवी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. गँरेजमधील दुचाकीची रिम डोयात मारून जखमी केले. तुला जिवे ठार मारू अशी धमकी दिली. दळवी यांना मारहाण झाल्याचे त्यांच्या भावाला कळताच त्यांनी गँरेजवर धाव घेतली. जखमी दळवी यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांनी जबाबावरून गुन्हा दाखल केला आहे.