जंगल व जंगलातील प्राणी वाचवण्यासाठी वृक्ष लागवड करावी

0
17

नगर – दरवर्षी २१ मार्च रोजी जागतिक वन दिन साजरा केला जातो. वनक्षेत्र कमी होत असल्याने वेळी अवेळी पडणारा पाऊस, वाढती उष्णता व प्रदूषण यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. तसेच जंगलातील झाडे मोठ्या प्रमाणात नष्ट होत असल्याने वन्य प्राण्यांचा नैसर्गिक अधिवास कमी झाल्याने जंगलातील प्राणी रहिवासी भागात येत आहे. जंगलतोड थांबवा व पर्यावरणाचे रक्षण करा. जंगल व जंगलातील प्राणी वाचवण्यासाठी जास्तीत जास्त वृक्ष लागवड करून वनक्षेत्र वाढवण्याची गरज आहे, असे प्रतिपादन वनपरिक्षेत्र अधिकारी हेमंत उबाळे यांनी केले आहे. हिंदसेवा मंडळाच्या मेहेर इंग्लिश स्कूलमध्ये शाळेचे चेअरमन जगदीश झालानी यांच्या मार्गदर्शनानुसार जागतिक वन दिन उत्साहाने साजरा करण्यात आला. जंगल वाचवाव प्राणी वाचवाहा सामाजिक उद्देश डोळ्यासमोर ठेवून शाळेत जंगलाची माहिती देणारे पोस्टर्स लावण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांनी वाघ, सिंह, मोर, अस्वल, हत्ती, हरीण, माकड, ससा विविध प्राण्यांच्या वेशभूषा करुन उपस्थितांची मने जिंकली. निसर्ग गीत सादर केले. हरियाली चे अध्यक्ष सुरेश खामकर यांनी हरित वसुंधरा ची शपथ विद्यार्थ्यांना दिली. याप्रसंगी वनपरिक्षेत्र अधिकारी हेमंत उबाळे, वनपाल सचिन गायकवाड, वनरक्षक अफसर पठाण, मेहेर इंग्लिश स्कूलच्या प्राचार्य प्रा.अनुरिता झगडे आदी उपस्थित होते. सुरेश खामकर म्हणाले, वाढती लोकसंख्या शहरीकरण व औद्योगिक कारणामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने आपल्या वाढदिवसाच्या दिवशी एक तरी झाड लावावे. कोरोना काळात ऑसिजनचे पुरवठा करणारे फक्त झाडेच आहेत. हे सर्वांच्या लक्षात आले आहे. झाडे फळे, सावली देतात, रंगबिरंगी फुले गावाला व शहराला सुशोभित करतात. वृक्ष संवर्धन ही काळाची गरज आहे. प्रा.अनुरिता झगडे म्हणाले, जंगले वाचवा प्राणी वाचवाहा सामाजिक संदेश देण्यासाठी जागतिक वन दिन साजरा करण्यात येत आहे. ऑसिजन देणारी झाडे वड पिंपळ, कडुनिंब यासारख्या झाडाचे महत्व कोरोना काळात सर्वांना समजले आहे. जागतिक वन दिन वेगळ्या उपक्रमातून साजरा करून मेहेर इंग्लिश स्कूलने खारीचा वाटा उचलला आहे. या कार्यक्रमासाठी हिंद सेवा मंडळाचे पदाधिकारी यांचे नेहमीच मार्गदर्शन लाभत असते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शबाना शेख यांनी केले. तर आभार शितल दळवी यांनी मानले.