शिर्डी शहरात भरदिवसा गोळीबार, दोन गोळ्या झाडून आरोपी पसार

0
39

शिर्डी – शिर्डी शहरातील खाजगी पार्किंगमध्ये दुपारच्या सुमारास गोळीबार झाल्याची माहिची समोर आली आहे. सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. शिर्डी पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास करत आहेत. बंदुकीतून दोन गोळ्या झाडण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. गोळीबार करून आरोपी फरार झाले. गुरूवारी (दि.२१) दुपारच्या सुमारास शिर्डी शहरातील खासगी पार्किंगमध्ये गोळीबाराचा आवाज आला. भरदिवसा हा गोळीबार झाला. मात्र या गोळ्या नेमया कोणी झाडल्या, गोळीबार का केला, हे समजू शकलेले नाही. आरोपींनी बंदूकीतून दोन गोळ्या झाडल्या. त्यापैकी एक गोळी ही समोरत्या हॉटलेमधील रुमची काच तोडून आत घुसली. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही किंवा कोणतीही जीवितहानी झालेली नाही. गोळीबारानंतर आरोपींनी तेथून लागलीच पलायन केले. या घटनेची माहिती मिळताच शिर्डी पोलिस घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी पुढील तपास सुरू केला आहे. गोळीबार झाला तिथे व आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मिळतंय का याचाही पोलिस शोध घेत आहेत. गोळीबार नेमका का झाला आणि कोणी केला याबाबत तपास सुरू आहे.