अहमदनगर दक्षिण मतदारसंघाच्या समन्वयकपदी आ. संग्राम जगताप

0
43

नगर – अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघाच्या महायुतीच्या समन्वयकपदी आ. संग्राम जगताप यांची नियुक्ती करण्यात आली असून तसे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यांना दिले आहे. या पत्रात म्हटले आहे की, ३७-अहमदनगर (दक्षिण) लोकसभा मतदार संघासाठी समन्वयक पदाची जबाबदारी आपणास देण्यात येत आहे. आपण या लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भाजपा व शिवसेना तसेच महायुतीतील मित्रपक्ष, जिल्हा पालकमंत्री, आजी व माजी खासदार, आमदार सर्व जिल्हाध्यक्ष व प्रमुख यांच्याशी संपर्क करून महायुतीच्या उमेदवारासाठी प्रचार यंत्रणा व निवडणूक जास्तीत जास्त मताधियाने जिंकण्याच्यादृष्टीने बैठका घेवून समन्वय करावा.