लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १४४ जिल्ह्यात जारी

0
43

नगर – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ या निवडणूकीचा कार्यक्रम १६ मार्च रोजी जाहीर केलेला असुन त्यानुसार निवडणूकीच्या प्रक्रियेस १६ मार्च पासून सुरुवात झालेली आहे. भारत निवडणूक आयोगाने ३७ अहमदनगर लोकसभा मतदार संघ व ३८ शिर्डी या लोकसभा मतदार संघाची निवडणूकीसाठी १६ मार्च ते ६ जुन या कालावधीसाठी आदर्श निवडणूक आचार संहिता लागू केलेली आहे. भारत निवडणूक आयोगास भारतीय राज्य घटनेचे अनुच्छेद ३२४ खाली प्रदान केलेले अधिकाराचा वापर करुन सदर निवडणूका विना अडथळा व शांततेने पार पाडण्यासारठी निवडणूकीच्या काळात लाउड स्पिकर वापरण्यावर आयोगाने प्रतिबंध केला आहे. सर्व संबंधितांना नोटीसा देऊन त्यांचे म्हणने ऐकुण घेणेसद्यस्थितीत शय नसल्याने एकतर्फी आदेश काढण्यात आले आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, सिध्दराम सालीमठ यांनी फौजदारी प्रक्रीया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये आदेश काढले आहेत.

अहमदनगर जिल्हयातील सर्व लोकसभा मतदार संघाच्या हद्दीत कोणत्याही वाहनावर ध्वनीक्षेपक बसवून त्याचा वापर फक्त सकाळी ६ ते रात्री २२ वाजे पर्यंत संबंधित पोलीस स्टेशन अधिकारी यांची रितसर परवानगी घेऊन करता येईल असा वापर करत असतांना वाहन चालू ठेऊन ध्वनीक्षेपणाचा वापर करता येणार नाही. सर्व प्रकारच्या ध्वनक्षेपकाचे वापरास दररोज सकाळी ६ वाजेपासून ते रात्री २२ वाजे पर्यंत परवानगी राहील. सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी/निवडणूकीचे उमेदवार किंवा ध्वनीक्षेपकाचा वापर बाबत संबंधितांनी ध्वनीक्षेपकाचे वापराचे परवानगी विवरण मतदार संघ निवडणूक निर्णय अधिकारी व जवळच्या पोलीस स्टेशनला देणे बंधनकारक राहील. सदर आदेशाचा कोणीही कोणत्याही प्रकार भंग केल्यास ती व्यक्ती भारतीय दंड विधान संहिता कलम १८८ प्रमाणे शिक्षेस पात्र होईल. सदर बंदी आदेश हा १६ मार्च पासून अहमदनगर जिल्हयात सर्व लोकसभा मतदार संघाचे हद्दीत ११ मे सायंकाळी ५ वाजेपर्यंत अमलात राहील.