मानवता हा एक हिरा असून त्याला चमकविण्याचे काम करावे : गुरुवर्य भास्करगिरी महाराज

0
68

वैष्णवीनगर येथे श्री विश्वकर्मा समाज मंदिर कामाचे भूमिपूजन 

नगर – मानवता हा एक हिरा आहे त्याला चमकविण्याचे काम आपल्या सर्वांना करायचे आहे. आमदार संग्राम जगताप हे एक शहर विकासाचे चांगले इंजिन असून त्यांनी चांगले डबे जोडत काम करत आहे कै. बलभीम जगताप यांनी कुटुंबीयांना धार्मिकतेचा वारसा दिला असून तो माजी आ. अरुण जगताप आणि आ. संग्राम जगताप हे पुढे घेवून जात आहे, ज्यांनी त्यांनी आपापल्या समाजाला दिशा देण्याचे काम करावे आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून आपले कर्तव्य पार पाडावे, देशसेवेची प्रेरणा प्रत्येकाने अंगीकारावी यासाठी आपले घर परिसर या भागामध्ये चांगले काम उभे करावे, वास्तूचे काम करणारा म्हणजे विश्वकर्मा त्यांचे मंदिर शहरात नव्हते आता ते उभे राहत आहे पदावर येईपर्यंत एखाद्या पक्षाचा आधार घ्यायचा असतो त्यानंतर एखाद्या पक्षाप्रमाणे भरारी घेत समाजातील रंजल्या गांजल्या व्यक्तींसाठी काम करावे, रितीरिवाज बदलले असून आपण देश आणि मानवधर्माचे काम करावे असे प्रतिपादन गुरुवर्य ह भ प भास्करगिरी महाराज यांनी केले. वैष्णवीनगर येथे आ. संग्राम जगताप व श्री विश्वकर्मा त्वष्टा पांचाळ समाज यांच्या प्रयत्नातून श्री विश्वकर्मा समाज मंदिर कामाचे भूमिपूजन गुरुवर्य हभप भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते झाले. यावेळी गुरुवर्य श्री संगमनाथजी महाराज, गुरुवर्य राजाभाऊ कोठारी महाराज, गुरुवर्य अशोक भाऊ पालवे, दत्ताराम चौकटे महाराज, विजयनाथ केदारी बाबा, श्री विश्वनाथ चांगुणे महाराज, ह भ प दादा महाराज चांगुणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, स्थायी समितीचे माजी सभापती कुमारसिंह वाकळे, माजी नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, कार्याध्यक्ष अभिजीत खोसे, प्रा. माणिकराव विधाते, राहुल भागवत, राहुल ठोंबरे, सुनील नाळके, महेश नाळके, दामोदर नाळके, उमाकांत भोकरे आदींसह श्री विश्वकर्मा त्वष्टा पांचाळ समाज उपस्थित होता.

आ. संग्राम जगताप म्हणाले की, आपला जिल्हा हा संतांच्या विचाराने पावन झालेला असून गुरुवर्य भास्करगिरी महाराज हे आपले वैभव आहे शहरामध्ये विविध भागात मंदिर व समाज मंदिर उभे राहावे यासाठी महापालिकेच्या माध्यमातून जागा उपलब्ध करून दिली आहे, मंदिरे ही समाजाचे श्रद्धास्थान असून त्या माध्यमातून संस्कार पोहचत असतात संत महंतांच्या विचाराची पालखी आपण सर्वजण मिळून पुढे घेऊन जाऊया समाज कोणताही असो काम करणारे लोक म्हणजे भगवान विश्वकर्मा. त्यांचे विचार आपल्या सर्वांना पुढे घेऊन जात समाजाची उन्नती करायची आहे श्री विश्वकर्मा देवस्थान त्वष्टा पांचाळ समाज एकत्र येऊन भव्य मंदिर उभारत आहे चांगल्या विचाराचे लोक एकत्र आल्यास चांगले काम होत असते, श्री गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या विचाराने आम्ही काम करत आहोत असे ते म्हणाले. हभप राजाभाऊ कोठारी म्हणाले, आपला धर्म टिकवणे गरजेचे झाले आहे. आपली तरुण पिढी बरबाद होत असून त्यांना वाचवण्याचे काम संतांच्या विचारातून नक्की होईल. यासाठी मंदिर व समाज मंदिर उभे राहणे गरजेचे आहे. धर्मवाढीसाठी आ. संग्राम जगताप काम करीत आहे. राजकीय धामधूम सुरू असताना देखील शहराचे लोकप्रतिनिधी छोट्या मोठ्या समाजकार्यामध्ये सहभागी होत असतात. त्यांचे सुरू असलेले विकासाचे व संतांचे विचार प्रबोधनाच्या माध्यमातून समाजामध्ये पोचवण्यासाठी समाज मंदिर उभारणीचे काम कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले. प्रास्ताविक उमाकांत भोकरे यांनी केले. सूत्रसंचालन भारत रेघाटे यांनी केले. आभार विलास पाथरकर व लक्ष्मीकांत भोकरे यांनी मानले.