‘रोटरी क्लब मिडटाऊन’तर्फे घरकाम करणाऱ्या दोनशे महिलांना ‘गृहसाहित्य किटची’ दिली भेट

0
20

नगर – रोटरी लब अहमदनगर मिडटाउन, ब्रेनजिम स्कूल आणि लगन ग्रुप यांच्या एकत्रित पुढाकारातून ‘सहेली’ उपक्रमा अंतर्गत शहरातील सुमारे दोनशे घरकाम करणार्‍या महिलांची आरोग्य तपासणी, दंत व रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पाईपलाईन रोड वरील माय सिनेमा येथे झालेल्या या उपक्रमाचे उद्घाटन रोटरी लब मिडटाउनच्या अध्यक्षा मधुरा झावरे यांच्या हस्ते झाले. या शिबिरात सहभागी महिलांची डॉ. दीपाली अनभुले, डॉ. सोनल बोरुडे व डॉ.योगिता सत्रे यांनी आरोग्य तपासणी, डॉ. नंदकर लॅबच्या सहकार्याने हिमोग्लोबिन व रक्त शर्करा तपासणी तसेच डॉ. प्राची इंगळे व डॉ. नितीश इंगळे यांनी दंत तपासणी केली. यावेळी महिलांच्या मनोरंजनासाठी ‘वर्‍हाड निघालय लंडनला’ या प्रसिद्ध विनोदी एकपात्री नाटकाचा प्रयोग अभिनेते योगेश सोहोनी यांनी सादर केला. संयोजकांच्या वतीने उपस्थित घरकाम करणार्‍या महिलांना सुमारे सातशे रुपयांचे गृह साहित्य किट व अल्पोपहार देण्यात आला.

मधुरा झावरे म्हणाल्या, संसाराच्या गाड्याला हातभार लावत घरगुती काम करणार्‍या महिलांची संख्या नगर शहरात मोठ्या प्रमाणात आहे. रोजच्या काम तणावात याही महिला स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असतात. त्यांच्या आरोग्याच्या समस्यांचे निराकरण होण्यासाठी रोटरी मिडटाऊन लबच्या वतीने या सामाजिक उपक्रमाचे आयोजन केले आहे. यासाठी अनेकांनी सहकार्य केले आहे. यावेळी पूर्वी पुरस्वानी, टीना इंगळे, रंजना ब्रह्मा, सुधा खंडेलवाल, वर्षा पांडे, श्रद्धा इंगळे, पल्लवी इंगळे, नैना मुथा, सुजाता वाबळे, प्रियांका परिख, संगीता मेंघानी, नेहा मेंघानी, धनश्री खोले, प्रियांका पिसुटे, स्वीटी गुप्ता, निशा अग्रवाल, अश्विनी दगडे, सुजाता उबाळे, मर्लीन एलिशा, सहाय्यक प्रांतपाल क्षितिज झावरे, प्रताप पांडे, रमेश वाबळे, मधुर बागायत, अजय पिसुटे, डॉ. नंदकर, विक्रम पानसंबळ, प्रमोद परिख उपस्थित होते.