ज्युनिअर राजस्थानी बहु मंडळाच्या अध्यक्षपदी सौ. अलका बलदवा यांची निवड

0
17

सेक्रेटरी सौ.जया बिहाणी; खजिनदार सौ. अर्चना मालू

नगर – ज्युनिअर राजस्थानी बहु मंडळाच्या अध्यक्षपदी सौ.अलका बलदवा यांची निवड करण्यात आली. याचवेळी मंडळाच्या सेक्रेटरीपदासाठी सौ. जया बिहाणी यांची तर खजिनदारपदासाठी सौ. अर्चना मालू यांची निवड करण्यात आली. राजस्थानी समाजातील सर्व महिला मंडळाच्या अध्यक्षा यावेळी उपस्थित होत्या. सौ.अलका बलदवा यांनी ज्युनिअर राजस्थानी बहु मंडळाच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच सजावटींवर खर्च न करता एनजीओंना आवश्यक ते सहकार्य केले जाईल. समाजोपयोगी विविध कार्यक्रमांचे नियोजन करून सर्वांना सामावून घेतले जाईल, असे सांगून नियोजन समिती स्थापन करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. या समितीकरिता दुर्गा जाजू, अंकिता हेडा, दिपिका चांडक, कविता काकाणी, कविता मंत्री, पूजा बिहाणी, पूजा लड्डा, प्रिती झंवर, शितल बिहाणी, शितल डागा, आश्विनी सोनी या गृहिणींची निवड करण्यात आली. सौ.अलका बलदवा यांनी १६० सभासद असलेल्या या मंडळाच्यावतीने भारतीय संस्कृतीस साजेसे आणि नव्याचा वेध घेणारे कार्यक्रम आयोजित करण्यावर भर दिला जाणार आहे. रंगारंग कार्यक्रमाचे नियोजन करताना मनोरंजनासोबत समाज प्रबोधनही करण्यात येणार आहे, अशी माहिती देवून नगर शहरातील टिळक रोडवरील मतिमंद मुलांच्या शाळेस बौध्दीक खेळाच्या साधनांची भेट देत मंडळाच्या नवीन कार्यकारिणीच्या कार्याचा श्रीगणेशा केला. शहरातील ज्युनिअर राजस्थानी बहु मंडळाच्या माध्यमातून सामाजिक सेवेची संधी दिल्याबद्दल सेक्रेटरी सौ. जया बिहाणी यांनी आभार मानले.