मनपाचे अति.आयुक्त डॉ. प्रदीप पठारे, उपायुक्त सचिन बांगर, अजित निकत यांची बदली

0
54

नगर – भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अहमदनगर महानगरपालिकेचे अतिरित आयुत डॉ. प्रदीप पठारे, उपायुत सचिन बांगर व अजित निकत यांची राज्य शासनाने बदली केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने महानगरपालिकांम धील आयुत, अतिरित आयुत व उपायुत या पदांवरील अधिकार्‍यांच्या बदल्या पदस्थापनेबाबत मार्गदर्शक सूचना, निकष निर्गमित केले असून, सदर मार्गदर्शक सूचनांच्या तरतुदीनुसार तसेच महाराष्ट्र शासकिय कर्मचार्‍यांच्या बदल्याचे विनियमन आणि शासकिय कर्तव्य पार पाडणार्‍या होणार्‍या विलंबास प्रतिबंध अधिनियमानुसार राज्यातील ३४ अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. सदर आदेशानुसार अहमदनगर महापालिकेतील अतिरित आयुत डॉ. पठारे, उपायुत बांगर व निकत यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तथापि त्यांना कोठे पदस्थापना दिली, याबबातचे आदेश अद्याप काढण्यात आलेले नाहीत. त्यांच्या नवीन पदस्थापनेबाबत स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येतील, असे शासनाने स्पष्ट केले आहे. निवडणूक आयोगाच्या १८ मार्चच्या सूचनेनुसार सर्व अधिकार्‍यांना तत्काळ त्यांचा पद्भार अन्य अधिकार्‍यांकडे देवून कार्यमुत व्हावे, असे या बदल्यांच्या आदेशांमध्ये स्पष्ट करण्यात आलेले आहे.