आनंदधाम चौकातील हायमास्ट दिवा बंद

0
35

आनंदधाम चौकातील १३ मीटर (४० फुटी) हायमास्ट दिवा गेल्या अनेक दिवसापासून नादुरूस्त झालेला आहे. त्यामुळे रात्री या भागात अंधार असतो. शहरात सर्वत्र एलईडी दिवे लावण्याचा निर्णय महापालिकेकडून घेण्यात आला तरी शहरातील मुख्य रहदारीचा चौक म्हणून असलेल्या आनंदधाम परिसरातील दिवा बंद अवस्थेत आहे. ठेकेदार कंपनी ईं स्मार्टकडे दुरुस्ती करण्यासाठी मटेरियल नसल्याने सदर हायमास्ट बंद असल्याचे सांगितले जाते. या भागात राष्ट्रसंत आचार्य सम्राट श्री आनंदऋषीजी महाराज साहब यांच्या ३२ व्या स्मृती दिनानिमित्त २१ ते २८ मार्चदरम्यान व्याख्यानमाला तसेच धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे. यामुळे या भागात राज्य तसेच देशातून भाविकांची गर्दी होत असते. सदर हायमास्ट दिव्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.