आ.जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला नगरमध्ये ‘जोडे मारो’ आंदोलन

0
27

नगर – मुंबई मुंब्रा येथे काँग्रेसचे राहुल गांधी यांच्या सभेमध्ये जितेंद्र आव्हाड यांना निळा पंचा घालत असताना फेकून देण्यात आला याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने मार्केट यार्ड चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर निषेध व्यक्त करून वादग्रस्त आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी शहर जिल्हा अध्यक्ष सुरेश बनसोडे, महिला अध्यक्ष साधनाताई बोरुडे, अंकुश मोहिते, वैभव ढाकणे, समीर भिंगारदिवे, सुभाष वाघमारे, सागर विधाते, विशाल बेलपवार, वीर चव्हाण, बाबा कदम, ऋषी विधाते, ओम भिंगारदिवे, आनंद ठोंबरे, बबलू भिंगारदिवे, सुजल विधाते, विकी साठे, सिद्धांत विधाते, मयूर विधाते, गौरव विधाते, प्रशांत लोखंडे, कुणाल म्हस्के, गांधी विधाते आदीसह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सुरेश बनसोडे म्हणाले की, नेहमीच बेताल वक्तव्य करून राज्यात शांतता भंग होणार असे वक्तव्य करणारे वादग्रस्त आमदार जितेंद्र आव्हाड यांनी निळा पंचा फेकून दिला व कार्यकर्त्यांना अरेरावीची भाषा केली. त्यामुळे भीमप्रेमीच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याने राष्ट्रवादी अजित पवार गट व आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने आव्हाड यांचा निषेध करून जोडे मारो करुन कारवाई करण्याची मागणी आंबेडकरी जनतेच्या वतीने करण्यात आली आहे.