केडगाव ताराबाग कॉलनी येथे रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ
नगर – केडगाव उपनगराचा आम्ही सर्वजण मिळून एक विचाराने विकासाची कामे टप्प्याटप्प्याने मार्गी लावत आहे या कामासाठी खा. डॉ. सुजय विखे पाटील व आ. संग्राम जगताप यांचे मोठे सहकार्य लाभले आहे. तरी नागरिकांनी त्यांनी केलेल्या कामाच्या मोबदल्यात मतदानरुपी आशीर्वाद द्यावे, जेणेकरून पुढील काळात केडगावच्या विकासासाठी मोठा निधी प्राप्त होईल, केडगाव मधील ११० रस्त्यांचा प्रस्ताव तयार केला असून त्याच्या मंजुरीसाठी प्रयत्न सुरू आहे प्रभाग क्रमांक १७ मध्ये माजी नगरसेवक मनोज कोतकर यांनी चांगले काम केले आहे. नागरिकांच्या सहकार्यातून चांगले काम उभे राहत असते, या माध्यमातून काम करण्यासाठी प्रेरणा व ऊर्जा मिळत असते, विकास कामांच्या माध्यमातून नागरिकांची ऋणानुबंध निर्माण होत असल्याचे प्रतिपादन उद्योजक सचिन कोतकर यांनी केले. केडगाव ताराबाग कॉलनी येथे माजी सभापती मनोज कोतकर यांच्या पाठपुराव्यातून व खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ उद्योजक सचिन कोतकर यांच्या हस्ते झाला.
यावेळी माजी नगरसेवक सुनील कोतकर, जालिंदर कोतकर, बच्चन कोतकर, सोनू घेंबूड, भूषण गुंड, श्याम कोतकर, सुधा लाटे, नमिता देशपांडे, रत्नप्रभा चव्हाण, पद्मावती सोमवंशी, दीपा भंडारी, सुरेखा वडागे, माया राजहंस, ललिता धामणे, दत्ता नन्नवरे, सचिन माताडे, सरजील शेख, सचिन बोर्डे, सुनील वाबळे, अनिल राजहंस, किरण पोटे, अजय शिंदे, भाऊसाहेब बर्डे, बबन निकाळे, महेंद्र गायकवाड, जितेंद्र गायकवाड, रूपाली मकासरे. मनोज कोतकर म्हणाले की, खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून पुणे रोड ते देवी रोडला जोडणारा ताराबाग कॉलनीतील रस्ता मंजूर झाला असून हा दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. लवकरच रस्त्याचे काम पूर्ण होणार आहे. उद्योजक सचिन कोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली केडगाव परिसरामध्ये चांगले काम उभे राहत आहे असे ते म्हणाले.