नगर – केंद्र व राज्य सरकार महापालिकेच्या माध्यमातून स्वच्छतेवर मोठे काम केले जात असून नागरिकांमध्ये देखील स्वच्छतेबाबत जनजागृती व्हावी यासाठी विविध उपक्रमाचे आयोजन केले जाते, प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरापासून स्वच्छतेचे सूत्र अंगीकारल्यास आपला प्रभाग, शहर, राज्य व देश स्वच्छ राहण्यास मदत होईल, त्या माध्यमातून स्वच्छ, सुंदर प्रभाग संकल्पना यशस्वी होईल व नागरिकांचे आरोग्य सदृढ, निरोगी राहण्यास मदत होईल स्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये लोकचळवळ उभी राहणे गरजेचे आहे, आपला ओला व सुका कचर्याचे वर्गीकरण करूनच घंटागाडीमध्ये टाकावा, यासाठी प्रभागातील महिलांना डस्टबिनचे वाटप केले आहे, संत गाडगेबाबा यांनी समाजामध्ये स्वच्छतेचे महत्व पटवून देण्याचे काम केले आहेत, आज त्यांचे विचार प्रत्येकाने अंगीकारून शहर स्वच्छतेबाबत लढा उभा करावा असे प्रतिपादन महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती पुष्पा बोरुडे यांनी केले. पुष्पा बोरुडे यांच्या वतीने प्रभागातील महिलांना डस्टबिनचे वाटप माजी महापौर रोहिणी शेंडगे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पुष्पा बोरुडे, अनिल बोरुडे, माजी नगरसेवक सचिन शिंदे, श्याम नळकांडे आदी उपस्थित होते. रोहिणी शेंडगे म्हणाल्या की, महानगरपालिकेच्या माध्यमातून नगर शहरांमध्ये स्वच्छतेचा उपक्रम यशस्वी करण्याचे काम सुरू आहे आपले शहर कचराकुंडी मुक्त झाले आहे. अनिल बोरुडे हे नेहमीच प्रभागांमध्ये वेगवेगळ्या संकल्पना राबवत यशस्वी करत असतात, डस्टबिन वापराच्या माध्यमातून आता नागरिक रस्त्यावर कचरा न टाकता थेट घंटागाडीतच टाकतील व आपला परिसर स्वच्छ ठेवण्यास मदत करतील अशी अपेक्षा व्यक्त करते, नागरिकांच्या सहकार्यातून नगर शहराला केंद्र व राज्य सरकारचे स्वच्छतेबाबत विविध पुरस्कार प्राप्त झाले आहे तरी पुढील काळामध्ये आपण सर्वजण मिळून आपले प्रभाग व शहर स्वच्छ सुंदर व हरित ठेवण्यासाठी काम करू बालिकाश्रम रोड परिसराचा विकास कामातून कायापालट झाला असून या परिसराला सुशोभीकरणाचे स्वरूप प्राप्त झाले आहे असे त्या म्हणाल्या.