धारधार हत्यार व कोयत्याचा धाक दाखवून गुन्हे करणाऱ्या विधीसंघर्षीत बालकांकडून चोरीचे मोबाईल हस्तगत

0
57

नगर – रेल्वे स्टेशन, अहमदनगर परिसरात १५ मार्च रोजी पहाटे ४ वा. मोपेड गाडीवरुन संशयीत रित्या दोन मुले फिरताना असल्याने रात्रगस्त अधिकारी सपोनि योगिता कोकाटे, पो.हे.कॉ. तनवीर शेख, पो.कॉ. अर्जुन फुंदे, होमगार्ड चंद्रकांत गायकवाड यांनी या मुलांना हटकले असता त्यातील एक मुलगा अंधाराचा फायदा घेवुन पळून गेला. उर्वरीत मुलास ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव पत्ता विचारला असता तो विधीसंघर्षीत बालक असल्याचे दिसुन आले. त्याची सपोनि कोकाटे मॅडम यांनी पंचासमक्ष झडती घेतली असता त्यांच्या ताब्यात एक होंडा अ‍ॅटीवा कंपनीची बिगर नंबरची मोपेड, एक काळे रंगाचा त्यावर प्लॅस्टीक मुठ असलेले लोखंडी धारदार हत्यार, लोखंडी कोयता, एक काळ्या रंगाचा त्यावर प्लॅस्टीक कव्हर असलेला ओपो उझक २५९१ मोबाईल फोन, एक रंगबिरंगी कव्हर असलेला रिअलमी कंपनीचा ८ आय मॉडेलचा मोबाईल फोन असे मिळुन आले. त्याबाबत कोतवाली पोलीस स्टेशन गु.र.नं. ३३२/२०२४ शस्र अधिनियम ४/२५ प्रमाणे दि. १५ मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी दिलेल्या आदेशान्वये विधीसंघर्षीत बालकाकडे गुन्ह्याचे अनुशंगाने अधिक विचारपुस केली असता त्याने तो त्याचा जोडीदारासह रात्रीचे वेळी शहरात फिरुन एकट्या दिसणारे इसमांना टार्गेट करुन त्यांना कोयत्याचा धाक दाखवून त्यांचेकडील मोबाईल, रोख रक्कम चोरी करित असल्याचे तसेच चोरी केलेले मोबाईल त्याचा मित्र अभिषेक केशव पवळ, रा. गांधीमैदान, अहमदनगर यास विक्री करण्याकरिता देत असल्याचे सांगितले. गुन्ह्यात एकुन ६ मोबाईल जप्त करण्यात आले असुन त्याबाबत अधिक तपास चालु आहे. नमुद विधीसंघर्षीत बालकाचे ताब्यात मिळुन आलेली मोपेड, ओपो मोबाईल हा चोरीचा असल्याचे त्याने सांगितले वरुन अधिक माहीती घेतली असता त्यांच्या ताब्यात मिळुन आलेला ओपो कंपनीचा मोबाईल बाबत तोफखाना पोलीस स्टेशन, अहमदनगर येथे गु.र.नं. ३३४/२०२४ भादंवि क. ३९४ प्रमाणे दि. १५ मार्च रोजी गुन्हा दाखल आहे.

या गुन्ह्यात चोरी गेलेला मोबाईल व विधीसंघर्षीत बालकाकडे मिळून आलेला ओपो मोबाईल हा एकच असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, सपोनिरी. योगीता कोकाटे, पो. हे.कॉ. तनवीर शेख, शाहीद शेख, पो.ना. अविनाश वाकचौरे, पो.हे.कॉ.भांड पो.कॉ. दिपक रोहोकले, सत्यजित शिंदे, तानाजी पवार, प्रमोद लहारे, अतुल काजळे, सुरज कदम, सोमनाथ केकान, शिवाजी मोरे, महेश पवार, अभय कदम, अमोल गाडे, सुजय हिवाळे, अमोल गाडे, होमगार्ड चंद्रकांत सोनवने यांनी केली आहे.