शहर विकास हेच भाजपचे लक्ष : माजी महापौर बाबासाहेब वाकळे

0
23

सन्मित्र कॉलनी येथे डी पी ट्रांसफार्मर तसेच धनाजीनगर येथे रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ 

नगर – महापालिकेत भाजपची सत्ता असताना शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचे निर्णय घेत टप्प्याटप्प्याने कायम स्वरूपीचे विकासाचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये नगर शहर कचराकुंडी मुक्त करून दररोज घरोघरी जाऊन कचर्‍याचे संकलन करण्यासाठी घंटागाड्या उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच नगर शहरांमध्ये ३५ हजार लाईट बसून प्रकाशमय शहर निर्माण केले. विकास हाच भाजपचे लक्ष असून त्यानुसार शहरामध्ये कामे सुरू आहे. प्रभाग क्रमांक ६ मध्ये विकासाची कामे मार्गी लावली असल्यामुळे नागरिक समाधानी आहे. समस्या मुक्त प्रभाग निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे खा.डॉ.सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी मोठा निधी प्राप्त झाला असून टप्प्याटप्प्याने विकासाची कामे मार्गी लागणार आहे. भाजपच्यावतीने नगर शहरात चांगले कामे उभे राहत असल्याने समाधान मिळत आहे असे प्रतिपादन माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले. सावेडी येथे बाबासाहेब वाकळे यांच्या पाठपुराव्यातून व खा.डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून सन्मित्र कॉलनी येथे ट्रांसफार्मर तसेच धनाजीनगर येथे रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांच्या हस्ते झाले.

यावेळी बाबासाहेब वाकळे, माजी सभागृह नेते रवींद्र बारस्कर, माजी नगरसेविका वंदना ताठे, विलास ताठे, माजी नगरसेवक सचिन पारखे, भीमाची कोकणे, विजय हेगडे, राजू शेकटकर, रमनिक हेडा, खेमचंद सचदेव, शिवकुमार देवी, संग्राम होळकर, रवींद्र शहा, संजय वाघ, संजय पाखले, अशोक मिरंडे, डॉ.अविनाश मोरे, शंतनू भावे, किरण गायकवाड, धर्मेंद्र गीते, हनुमंत भापकर, शिवकुमार चारू, तृप्ती शहा, रेखा शेकटकर, वैशाली शेकटकर, विमल कोकणे, स्वाती होळकर, महेश तनपुरे, विजय गायकवाड, अविनाश झिकरे, गणेश झिकरे, गणेश गंधे, संदीप कोकाटे, प्रदीप कोठारी, रामचंद्र दरे, प्रभाकर शिर्शिकर, अमित काळे, अमित महादार, सावन गुलाटी, अरविंद कोलते पाटील, शिवाजी सानप, कुमार राजहंस, किशन मनकानी, जवाहरलाल नांदुरकर, अभिजित नांदुरकर, श्रीपाद वाळके, महेश वाघे, जितू मुनोत, प्रकाश सुपेकर, विजय कुदळे आदी नागरिक उपस्थित होते. अभय आगरकर म्हणाले की, भाजप पक्षाची दिशा आणि धोरणानुसार आम्ही जनतेचे प्रश्न सोडवीत असतो प्रभाग क्रमांक ६ मधील चारही नगरसेवकांनी चांगले काम उभे केल्यामुळे नागरिक समाधानी आहे. नगर शहराची औद्योगिक वसाहत वाढणे गरजेचे आहे. त्या माध्यमातून रोजगार निर्मिती होईल छत्रपती संभाजी नगर व नाशिक शहर आपल्या पाठीमागून येऊन पुढे गेले आहे. त्याचे कारण औद्योगिक वसाहतीचा विस्तार नगर शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून विकासाची कामे मार्गी लागली जात आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खा.डॉ. सुजय विखे पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पहिल्यांदाच एवढा मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे, असे ते म्हणाले.