दिन दुबळ्यांची सेवा करणे हे भगवंत आचार्य आनंदऋषीजींचे स्वप्न होते

0
19

आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये जनरल सर्जरी शिबिरास प्रतिसाद

नगर – दिन दुबळ्यांची सेवा करणे हे भगवंत आचार्य आनंदऋषीजींचे स्वप्न होते. ते साकारण्याचे कार्य आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये होत आहे. या हॉस्पिटलचे समाजसेवेचे कार्य भारतभर प्रसिद्ध आहे. येथे रुग्णांना औषधोपचारांसोबतच गुरुदेव आचार्य आनंदऋषीजींचा आशीर्वाद देखील मिळतो. जैन सोशल फेडरेशनचे मानवतावादी कार्य उल्लेखनीय आहे. जैन सोशल फेडरेशनने लुणिया परिवाराला शिबिरात सहभागी होण्याची संधी दिली. हे आमचे भाग्य समजतो, असे प्रतिपादन वर्षा उद्योग समूहाचे राजकुमार लुणिया यांनी केले आहे. राष्ट्रसंत आचार्य श्री आनंदऋषीजी म.सा.यांच्या ३२ व्या स्मृतिदिना निमित्ताने आनंदऋषीजी हॉस्पिटल येथे जनरल सर्जरी शिबिराचे उद्घाटन वर्षा उद्योग समूहाचे राजकुमार लुणिया यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.

या शिबिराचे आयोजन राजकुमार लुणिया, निखिल लुणिया, स्वप्निल लुणिया, सौ.श्रद्धा लुणिया, सौ.अंजली लुणिया, सौ.मंगलताई लुणिया व वर्षा उद्योग समूह अ.नगर यांच्या वतीने करण्यात आले होते. याप्रसंगी मॉर्निंग योगा ग्रुपचे सुभाष मुनोत, संजय वखारीया, दिलीप धोका, दिलीप गुगळे, सुनिल मालु, जैन सोशल फेडरेशनचे डॉ.आशिष भंडारी, प्रकाश छल्लाणी, प्रकाश मुनोत, महेंद्र कांकरिया, माणकलाल कटारिया, शिबिराचे तज्ञ डॉ. प्रवीण मुनोत, डॉ.विवेक भापकर, डॉ.राम पांडे आदी उपस्थित होते. प्रास्ताविकात प्रकाश छल्लाणी म्हणाले, लुणिया परिवाराचा धार्मिक व सामाजिक कार्यात नेहमीच सहभाग असतो. राजकुमार लुणिया यांचे हॉस्पिटलच्या कार्यात नेहमीच सह्योग मिळत असतो. आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये हार्ट सर्जरी, एन्जोप्लास्टी, डोळ्यांचे ऑपरेशन मोठ्या प्रमाणात सवलतीच्या दरात केले जातात. याचा अनेक रुग्णांना फायदा होतो. आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये निस्वार्थ भावनेने आरोग्यसेवा दिली जाते.येथे दुःख घेऊन येणारा रुग्ण हसत घरी जातो. या शिबिरात ११० रुग्णांची तपासणी करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.आशिष भंडारी यांनी केले. तर आभार प्रकाश छल्लाणी यांनी मानले.