अहिल्यानगरची ओळख विकसित शहर म्हणून महाराष्ट्राच्या नकाशावर आणणार

0
39

सारसनगरला संत सेना महाराज भवनात विकास कामांचा शुभारंभ

नगर – अहिल्यानगर शहरातील मुलभूत सोयी-सुविधांसाठी राज्य शासनाने नव्याने ८५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. यापुर्वी १५० कोटींचा निधी विविध विकास कामांसाठी मंजुर झालेला आहे. आपल्या शहराला आध्यात्मिक, धार्मिक वारसा लाभलेला आहे. धार्मिक स्थळे असलेल्या अहिल्यानगर मधील रस्त्यांचा प्रश्न प्राधान्याने सोडविले. काँक्रीटी रस्त्यांमुळे दर्जेदार कामे झाली. शहराच्या सौंदर्यात भर पडली. विकास कामांबरोबरच रोजगाराची संधी उपलब्ध करण्याचा मानस आहे. अहिल्यानगरची ओळख विकसित शहर म्हणून महाराष्ट्राच्या नकाशावर आणणार असल्याचे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले. सारसनगर येथील श्री संत सेना महाराज सांस्कृतिक भवन परिसरात रस्ता काँक्रीटीकरण, कुपनलिका, संरक्षक भिंत आदि विकास कामांचा शुभारंभ आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे प्रा.माणिक विधाते, उपमहापौर गणेश भोसले, नगरसेवक प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, नाभिक महामंडळाचे प्रांत उपाध्यक्ष माऊली गायकवाड, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, संत सेना महाराज ट्रस्टचे अध्यक्ष रामदास आहेर, सोमनाथ सोनवणे, विशाल सैंदाणे, ज्ञानेश्वर निकम, जीवन सोन्नीस, प्रशांत आहेर, प्रकाश वाघ, शाम विश्वास, सुनिल निकम, पवन सोनवणे, श्रीपाद वाघमारे, बापू औटी, हेमंत वाघ, नारायण हिरे, सोपान खोंडे, सागर खोंडे, चंद्रकांत गांगुर्डे, धनराज सोनवणे, प्रसाद सैंदाणे, नंदकुमार सोन्नीस, संजय सोन्नीस, राजेंद्र सोन्नीस, कैलास आहेर, मंदार सटाणकर, बाळासाहेब पगारे, सौ. उमा फुलपगार, रंजना खोंडे, वंदना निकम, भावना सुर्यवंशी, दिपाली निकम आदिंसह नागरिक उपस्थित होते.

आ.जगताप पुढे म्हणाले, अहमदनगरचे नामांतर अहिल्यानगर करण्यासाठी पाठपुरावा करुन प्रश्न मार्गी लागल्याचे समाधान वाटते. जगताप कुटूंब हे आध्यात्मिक वारसा जोपासत समाजकार्याला महत्व देते.राजकारणापेक्षा शहराचा विकास याला प्राधान्य दिले. त्यामुळेच शहराचे रुप बदलत आहे. अहिल्यानगरला विकास कामांमधून एक वेगळ वैभव प्राप्त करुन देणार, असे त्यांनी यावेळी सांगितले. प्रास्तविकात रामदास आहेर यांनी संत सेना महाराज प्रतिष्ठानच्यावतीने सांस्कृतिक भवन उभारणीची मागणी केली होती. स्थानिक नगरसेवकांनी ती पुर्ण केली. या भवन परिसर विकासासाठी आ.संग्राम जगताप यांच्या निधीतून कुपनलिका, संरक्षक भिंत, रस्ता कॉक्रीटीकरण कामांची मागणी केली. जी आज प्रत्यक्षात शुभारंभ होऊन पुर्ण होईल., असे सांगितले. यावेळी सोमनाथ सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन केतन आहेर यांनी केले तर आभार ज्ञानेश्वर निकम यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी खानदेशी युवा मंच व संत सेना महाराज ट्रस्टचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.