विकासकामांच्या माध्यमातून प्रभागाचे नंदनवन करू : कुमारसिंह वाकळे

0
32

प्रभाग ७ मध्ये पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्याच्या कामाचा शुभारंभ

नगर – बोल्हेगाव हा पूर्वी ग्रामीण भाग म्हणून समजला जात होता. महानगरपालिकेत समाविष्ट झाल्यानंतर देखील अनेक वर्ष बोल्हेगावला ग्रामीण भाग म्हणूनच अनेक जण समजत होते. या भागातील विकास कामांकडे अनेकांनी दुर्लक्ष केले. परंतु महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असताना देखील आ. संग्राम जगताप यांच्या माध्यमातून या परिसराच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्याचे काम सुरु आहे. आज प्रभागातील अनेक महत्त्वाची रस्ते झाले असून काही रस्त्यांची कामे पूर्णत्वाच्या दिशेने आहेत. थोड्या दिवसात या भागातील संपूर्ण खोळंबलेली विकास कामे पूर्ण करून प्रभागाचे नंदनवन करु असे प्रतिपादन माजी नगरसेवक कुमारसिंह वाकळे पाटील यांनी केले. बोल्हेगाव प्रभाग क्रं ७ मधील चिंतामणी रो हौसिंग, शिवाजीनगर, गणेशनगर, कातोरे वस्ती या भागासाठी ६ इंच पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्याचे कामाचा शुभारंभ कुमारसिंह वाकळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी राजेश कातोरे, उत्तमराव आडसुळ, अमोल लगड, नवनाथ कोलते, संतोष वाटमोडे, दशरथ वाकळे, भाऊ पुंड, जिवन पगार, निवृत्ती ऊंडे, सुनिल भालेराव, अक्षय दुधाळ, विलास जाधव, कानिफनाथ वाकळे, अमोल चौधरी, नवनाथ नेटके, विभीषण नाईक, संजय सोनवणे, रामराव शिरसाठ, माणिक कांबळे, शंकर राजगुरू, गणेश कुलट, अशोक चौधरी, वसंत जाधव, चांगदेव चौधरी, संजय शेरकर, ऋषिकेश अहिरे, थोरे काका, मोहम्मद खान, प्रदीप थोरात, संजय काळे, हसन सय्यद, वसंत जाधव, संतोष सरोदे, औटी सर, दत्तात्रय हळकुंडे, मोहन गोसावी, अजित सिंग, सुरेश लबडे, दादासाहेब शिंदे, निलेश चांदणे, रुस्तुम नगरकर, जंगलेबुवा, विजय शिदोरे, दत्तात्रय कातोरे, शेखर खाकाळ, सुदाम कातोरे, मुरकुटे आप्पासाहेब, तुषार ठोंबळ, बंटी गायकवाड, अतुल शेलार, संतोष जाधव, स्वप्निल राठोड, विकास गाडे, गणेश पवार, उदयसिंग वाणी, युनूस भाई शेख, भैय्या साळवे, अंकुश मराठे, शिवाजी महाजन, गणेश मगरे, बापू शिंदे, रवींद्र यादव, गोरक्षनाथ तांबे, विजय रावस आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते. पुढे बोलताना कुमारसिंह वाकळे म्हणाले की, नागरिकांनी विकास कामाबरोबरच वृक्षारोपणाची लोक चळवळ उभी करावी. आज मोठ्या प्रमाणावर वृक्षतोडीमुळे आपण निसर्गाच्या संकटांना सामना करत आहोत.

वेळीअवेळी उष्णता, पाऊस, थंडी या गोष्टी घडत असून मोठ्या प्रमाणावर जमिनीची हानी होत आहे. कोरोना काळात देखील ऑसिजनचे महत्त्व अनेकांना समजले. अनेकांनी ऑसिजन साठी मोठ्या प्रमाणावर खर्च केला. परंतु एका झाडाच्या माध्यमातून आपल्याला कित्येक वर्ष मोफत ऑसिजन मिळत असतो. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या परिसरात एक झाड लावणे गरजेचे आहे. परिसरात अनेक कॉलनी नव्याने विकसित होत असून या कॉलण्यांच्या ड्रेनेजसाठी सर्वच ड्रेनेज एका मोठ्या ड्रेनेज लाईनला जोडून देऊन ती ही समस्या सोडवण्याचे काम सुरू आहेत. त्यामुळे भविष्यात या प्रभागाला नंदनवनाचे स्वरूप प्राप्त होईल. तसेच आपल्या भागातील आठ चौकांचे सुशोभीकरण करून प्रभागाचा कायापालट करणार आहोत असे ते म्हणाले.

मुलांना मोबाईल ऐवजी मैदानी खेळांमध्ये व्यस्त करा : वाकळे

दरम्यान आपल्या भाषणात बोलताना कुमारसिंह वाकळे म्हणाले की, आजकाल मोठ्या तरुणांसह लहान मुलांमध्ये देखील मोबाईलचे व्यसन वाढले असून यामुळे मुलांच्या मानसिक तसेच शारीरिक विकास साधला जात नाही त्यामुळे पुढील भविष्यात या मुलांना मोठ्या आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागेल त्यामुळे आत्ताच पालकांनी आपल्या मुलांना मोबाईल ऐवजी मैदानी खेळांमध्ये व्यस्त करावे. मैदानी खेळामुळे त्यांच्या मानसिक तसेच शारीरिक विकास होत असतो आज आपण अनेकांमध्ये मोबोफोबिया पाहत असून यापासून आपल्या मुलांना दूर ठेवावे असे आवाहन त्यांनी केले.