श्री मंगल भक्त सेवा मंडळ आयोजित श्री हनुमान चालीसा पठणाच्या आणि भजन संध्येच्या कार्यक्रमाला सुरुवात

0
17

नगर – श्री मंगल भक्त सेवा मंडळ ऋ ७०, चखऊउ आयोजित श्री हनुमान चालीसा पठणाच्या आणि भजन संध्येच्या कार्यक्रमाला भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली. मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ कोठारी (श्री विषवेश्वर स्वामी महाराज) यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाच्या वतीने दर वर्षी ४० दिवस श्री हनुमान जयंती पर्यंत नगर शहरात विविध ठिकाणी भजन संध्यचे नियोजन केले जाते. रात्री ८.३० वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होत असते. या भक्तिमय वातावरणात रमण्या साठी आणि सहभाग घेण्यासाठी परिसरातील अबाल वृद्ध, महिला, पुरुष उपस्थित असतात. गेली २० वर्षापासून मंडळाच्या वतीने हा उपक्रम आनंदात आणि भक्तिमय वातावरणात पार पडत असतो. या भजन संध्येचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ कोठारी यांच्या वतीने करण्यात आले.